By preparing various products from Mahu flowers provides employment to tribal dhule news esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : आदिवासी बांधवांसाठी महू ठरतोय कल्पवृक्ष! पिंपळनेरच्या पश्चिम पट्ट्यात रोजगाराचे साधन

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : पिंपळनेरच्या पश्चिम पट्ट्यात आदिवासीबहुल भागात महूची झाडे ‘कल्पवृक्ष’ म्हणूनच ओळखली जातात. महू झाडाला येणाऱ्या महू फुलांचा हंगाम संपल्यानंतर टोळमी वेचणी करून आयुर्वेदिक खाद्यतेलाची निर्मिती केली जाते.

महू फुलांपासून मद्य (दारू), फळांपासून (टोळमी) तेल, झाडापासून दाट सावली, पक्ष्यांसाठी निवांत घरटे तयार केले जाते. सरपणासाठी लाकूड, तर दीर्घायुष्यी वृक्ष अशी या वृक्षाची ओळख. (By preparing various products from Mahu flowers provides employment to tribal dhule news)

पिंपळनेरच्या पश्चिम पट्ट्यात फुलांची वेचणी करण्यासाठी भल्या पहाटे गाव-पाड्यातील महिला-पुरुष दऱ्याखोऱ्यांत दिसून येतात. साक्री तालुक्यातील गावागावांत महूची असंख्य झाडे आहेत. घरासमोर आणि शेतबांधावर असलेल्या या झाडांच्या फुलांचा सुगंध परिसरात दरवळतो.

महू झाडाला येणाऱ्या महू फुलाची भल्या पहाटे पश्चिम पट्ट्यात वेचणी करतात. तो आदिवासी बांधवांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. फुलांपासून विविध पदार्थ तयार करून त्यातून आदिवासी बांधवांना रोजगारही मिळतो.

मार्च ते जून या कालावधीत येणारी महू फुले आणि त्यानंतर येणारी टोळमी यापासून तयार करण्यात येणारे पदार्थ वर्षभर टिकवून ठेवण्यासाठीची तयारीही महिला घरोघरी करत असून, पहाटे गोळा करण्यात आलेली महू फुले सुकवून त्यांना साठवून ठेवले जाते.

महू फुलाचे झाड बहुपयोगी असल्याने त्याला कल्पवृक्ष असेही म्हटले जाते. गुल्ली महू, रातगोल महू, डुंडाल महू, सिकट्याल महू, सिडनी महू, फाटाळ महू आदी सहा महू झाडांच्या प्रजाती सर्वश्रुत आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

हजारो वर्षांपासून आदिवासी बांधवांच्या जीवनशैलीत महूचा वापर करण्यात येतो. फुलाचा हंगाम गेल्यानंतर महू झाडाला येणाऱ्या टोळमीपासून तेल तयार करण्यात येते. ते तेल पश्चिम पट्ट्यात खाण्यासाठी वापरतात.

हे पदार्थ बनतात

महू फुलांपासून मदिरा (दारू), भाकरी, लाडू, खीर, भजी, उसळ, भाजलेले महू, रबडी, महू फुलांची बोंडे, चिंचोडे, चकल्या, महू चटणी, मोवसी, मोहाच्या लाटा, डुकल्या हे पदार्थ तयार करण्यात येतात. उन्हाळ्यात शरीरासाठी उपयुक्त असलेल्या पदार्थामुळे रोगप्रतिकारक्षमता वाढत असल्याचे सांगण्यात येते.

प्रामुख्याने मोहगाव, शेंदवड, चावडीपाडा, पिंपळपाडा, वडपाडा, केवडीपाडा, बारीपाडा, मोगरपाडा, मांजरी, वार्सा, सिताडी, काळांबा, धसकल, चोरवड, मळगाव, खरगाव, पारसरी, चरणमाळ, नांदरखी, बसरावळ या गावांत महूचे वृक्ष मोठ्या प्रमाणात आहेत.

"महू हा आमच्यासाठी कल्पवृक्ष असून, त्यापासून मद्य, तेल, सावली, सरपण, पक्ष्यांसाठी निवारा मिळतो, तसेच दीर्घायुष्यी वृक्ष अशी त्याची ओळख." -चैत्राम पवार, बारीपाडा

"महु फुलांपासून घाटा बनवून खातात, तर शेंगदाणे घालून लाडू बनवितात. भाकरी, उसळ, भाजी हे असे अनेक प्रकार बनवितात. यामुळे शरीर सशक्त होते, असे जुनेजानते सांगतात." -उमेश देशमुख, मोहगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tamhini Ghat Accident : दोन दिवस जेवलो नाही, खूप शोधलं पण... ताम्हिणी घाटातील अपघाताचे दृश्य पाहून मृत तरुणांचे मित्र ढसाढसा रडले

Mangalwedha News : कात्राळचे शहीद जवान बाळासाहेब पांढरे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Pachod Accident : अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण जागीच ठार; पाचोड पैठण रस्त्यावरील घटना

Delhi Mumbai Express way : दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे वर आता हेलिकॉप्टरची सेवा; अपघातातील जखमींना एअरलिफ्ट करता येणार, पर्यटनालाही चालना

Latest Marathi News Update : देश-विदेशात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT