Birthday boy esakal
उत्तर महाराष्ट्र

तलवारीने केक कापणे पडले महागात; बर्थ डे बॉय पोलिसांच्या ताब्यात

नंदुरबार जिल्ह्यामध्ये हत्यार बंदी आदेश लागू असतांनांही प्रकाशा (ता. शहादा) येथील तरुणाने तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा केला.

सकाळ वृत्तसेवा

नंदुरबार : जिल्हा परिषद व पंचायत समिती पोट निवडणुकीच्या अनुषंगाने तसेच नंदुरबार जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून जिल्ह्यात मनाई आदेश तसेच हत्यार बंदी आदेश लागू आहेत असे असतांनांही प्रकाशा (ता. शहादा) येथील तरुणाने हॉटेलजवळ तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा केला. मात्र तो आनंद केवळ काही वेळेपुरताच राहिला. कारण त्याने कायद्याचे उल्लंघन केल्याने पोलिसांनी त्याचावर कारवाई करीत तलवारीसह ताब्यात घेतले.

पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांना मिळालेल्या माहितीनुसार प्रकाशा (ता.शहादा) येथील अजय गावित याने ५ जून रोजी गावातील गौरव हॉटेलजवळ धारदार तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा केला होता. तसे फोटो समाज माध्यमावर वाऱ्यासारखे पसरत होते. त्या फोटोमुळे समाजामध्ये चुकीचा संदेश जात आहे. ही बाब लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक श्री.पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना कारवाईचे आदेश दिले. श्री.कळमकर यांनी पथकाचा माध्यमातून अजय गावित याची माहिती काढली. प्रकाशाच्या मुंजळा हट्टीतील घरी असल्याची माहिती मिळाली. पथकाने अजय गावित याच्या घराच्या चहूबाजूंनी सापळा रचून त्यास शिताफीने ताब्यात घेतले. त्याचे पूर्ण नाव अजय विजय गावित (वय २४) असे सांगितले. त्यास वाढदिवसाबाबत विचारणा केली असता त्याने तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा केल्याचे कबूल केले. तसेच ज्या तलवारीने केक कापला होता, ती तलवार अजय याने काढून दिली. अजय गावित विरुद्ध शहादा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

''वाढदिवस साजरा करणे हा गुन्हा नाही, परंतु तलवार किंवा धारदार शस्त्रांनी केक कापून वाढदिवस साजरा करणे हा कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे कोणीही कायदा हातात घेऊ नये. तलवार किंवा धारदार शस्त्रांनी कोणीही केक कापून वाढदिवस साजरा करताना आढळून आल्यास किंवा दहशत पसरवितांना मिळून आल्यास त्यांच्याविरूद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.'' - पी. आर. पाटील, पोलिस अधीक्षक, नंदुरबार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court Dowry Harassment Ruling : सासरच्यांनी सुनेला जुळवून घेण्यास सांगितल्यास गुन्हा दाखल होणार? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा आदेश

Latest Marathi News Live Update : अर्जुन खोतकर यांनी घेतली उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट

Blackmail case: महिलेसोबतच्या व्हिडीओवरून ब्लॅकमेल, बँक कर्मचाऱ्यानं उचललं टोकाचं पाऊल; ६ जणांवर गुन्हा, चौघांना अटक

Farmer Protest: कांद्याला भाव नाही, शेतकरी आक्रमक! पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना घेतलं ताब्यात, चांदवडमध्ये रस्त्यावर रणकंदन

Kolhapur VIP Service: कोल्हापूरसह परराज्यातील तरुणींकडून व्हिआयपी सर्व्हिस, म्हैसाळमधील आलिशान बारवर छापा; नशेत धुंद तरुणांना घेतलं ताब्यात

SCROLL FOR NEXT