crime  esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News: तलाठ्यासह 8 संशयितांवर गुन्हा; विनाचौकशी शेतजमीन नावावर

सकाळ वृत्तसेवा

Dhule Crime News : विनाचौकशी आणि कुठलीही खातरजमा न करता शेतजमीन दोघांच्या नावावर केल्याप्रकरणी तत्कालीन तलाठी, मंडळाधिकाऱ्यांसह आठ संशयितांवर निजामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

पंढरीनाथ गबा महिरे (वय ५६, रा. निजामपूर ता. साक्री) यांच्या फिर्यादीनुसार लक्ष्मीबेन (चापाबेन) धाकूभाई बिरारे यांनी त्याचे दुसऱ्यासोबत लग्न झालेले असताना खोटे नाव लावले. (case has been filed against 8 suspects including Talathi dhule news)

सखूबेन धाकूबाई बिरारे यांनी खोटे जन्मप्रमाणपत्र बनवून व इतर कागदपत्रे बनावट तयार केली. तसेच मणिलाल राजाराम महिरे, प्रदीप माणिक महिरे, जयभीम झुलाल भामरे, दादाभाऊ मोतीराम पिंपळे यांच्याशी संगनमत केले.

तसेच तत्कालीन तलाठी पंजू बैसाणे यांनी वारस नोंद करण्याबाबतची वर्दी दिल्यावर त्यांनी कोणतीही खातरजमा न करता नोंद दाखल केली. त्याचप्रमाणे तत्कालीन मंडळाधिकारी मरसाळे यांनी शंभर रुपयांच्या प्रतिज्ञापत्रावरील अक्षरात बदल व त्यावर गट क्रमांक नाही, हे स्पष्ट दिसत असताना कुठलीही चौकशी न करता संशयितांशी हातमिळवणी केली.

फेरफार नोंद क्रमांक २५५५ प्रमाणित करून त्यातील गट क्रमांक ८५/५ ही शेतजमीन लक्ष्मीबेन व सखूबेन यांच्या नावावर करून दिली. त्यावरून लक्ष्मीबेन बिरारे, सखूबेन बिरारे (रा. सायला ता. निझर जि. तापी), पुंजू बैसाणे (रा. धुळे), मंडळाधिकारी एन. एन. मरसाळे (रा. निजामपूर), मनीलाल महिरे, प्रदीप ठाकरे, दाजभाऊ पिंगळे (रा. आखाडे) व जयभीम पिंपळे (रा. सायला) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT