Chagan Bhujbal
Chagan Bhujbal 
उत्तर महाराष्ट्र

लोकसभा निवडणूक तर नाहीच लढवणार पण... : छगन भुजबळ

सकाळवृत्तसेवा

येवला : मी लोकसभा निवडणूक तर नाहीच लढवणार पण विधानसभा कि विधानपरिषद याचा निर्णय पक्ष घेईल..मात्र येवल्याशी नाते घट्टच राहील असे सूचक वक्त्यव्य करून भुजबळांनी कुठे निवडणूक लढविणार याबाबत साशंकता कायम ठेवली.पक्ष म्हणजे तुम्हीच असून तुम्ही ठरवाल ते होईल या प्रतिप्रश्नावर स्मितहास्य करत असे असले तरी पवार साहेब मला काय योग्य व काय अयोग्य याचे मार्गदर्शन करतात व करतील असे सांगून भुजबळानी निर्णयाचा चेंडू लोंबकळवत ठेवला.

भुजबळ यांनी सोमवारी दिवसभराचा दौरा आटोपल्यानंतर सम्पर्क कार्यालयात पत्रकारांशी चर्चा केली.यावेळी मतदारसंघाने माझ्या अडचणीच्या काळात मला साथ देऊन तीनदा येथून निवडून दिले.त्यामुळे येवलेकरांचे उपकार मी विशरु शकणार नाही असे पुन्हा एकदा आठवणीने नमूद केले.यावेळी जेष्ठ नेते माणिकराव शिंदे,वसंत पवार, भागवत सोनवणे,बाळासाहेब लोखंडे,सुनील पैठणकर,भूषण लाघवे,विजय जेजुरकर,संतोष खैरनार आदि उपस्थित होते.

माझ्या अडचणीच्या काळात माझ्या खिशातून जेवढे नाणे पडले नसतील तेवढे कार्यकर्ते दूर गेल्याचे सांगत भावना व्यक्त केल्या.मागील लोकसभा निवडणुकीत नाकारलेल्या नाशकात पक्षाने आदेश दिल्यावरही यावेळी लढणार काय या प्रश्नावर उत्तर देतांना त्यांनी, मागील लोकसभा निवडणुकीच्या वेळी मोदी लाटेत सर्वच पक्ष गर्द झाले होते,आता ती लाट भीती नाही.मात्र माझा निर्णय पक्ष घेईल हे पुन्हा नमूद केले.माझे आजही येवल्यावर विशेष प्रेम असून कुठेही कोणी वाबोलले तर मला वाईट वाटते.आजही मंत्रालयासह राज्यात येवला आणि भुजबळ यांचे समीकरण कायम असून काही अधिकारी येवला म्हटले की भुजबळ म्हणून टेबलावर वर असलेली फाईल एक तर खाली ठेवतात अन्यथा फाईल वर काढून मंजूर करतात असेही भुजबळ म्हणाले.

आबळ झाली तर...
मोदी सरकारने सर्वसामान्याची वाट लावली असून पत्रकार देखील यातून सुटले नसल्याने आगामी निवडणुकीत जनता धडा शिकवेल असेही ते म्हणाले. आपल्याअभावी मतदारसंघाची आबळ सुरु असून विकासकामे ठप्प झाल्याचे सांगताच,आबळ झाली तर पत्रकार गबाळ्याना कशाला मोठे करताय असा उपरोधिक टोला त्यांनी मारला.कोणीही जाते अन मांजरापाड्यावर फोटो काढून काम करण्याच्या वल्गना करतात पण हे काम मीच करणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. माझ्या मंत्रिपदाच्या काळात असलेल्या सुंदर शहराची अवस्था बघून खूप वाईट वाटत असल्याचे ते म्हणाले.उभ्या केलेल्या देखण्या इमारतीची देखभाल अधिकाऱ्यांनी ठेवणे आवश्यक असून प्रशासकीय इमारतीची वास्तू ही संपूर्ण राज्याचे मॉडेल ठरले होते याची आठवण करून देताना स्वच्छ इमारती ठेऊन नागरिकांना सेवा देणे आवश्यक असल्याचे भुजबळ म्हणाले.

येवल्यातील विकासाला मी अडचणीत असताना खीळ बसली पण आता आपण सर्व माझ्या पाठीशी उभे रहा. विरोधकांनी हेल्दी स्पर्धा करून सोबत करावी म्हणजे विकासकामे आपण मार्गी लावता येतील असेही त्यांनी सांगितले.शिवसेनेत प्रवेश करनार का या प्रश्नावर बोलताना भुजबळ यांनी २७ वर्षे शिवसेना सोडून झाली तरी लोक मी शिवसेना सोडल्याचे आजही विसरत नाही,त्यामुळे पुन्हा राष्टवादी सोडली तर हे पुरेल. त्यामुळे राष्ट्रवादी सोडण्याचा कुठलाही विचार नसून पवार साहेबांवर माझा पूर्ण विश्वास असून त्यांचा सारखा दूरदृषीचा व शेतकऱ्यासाठी काम करणारा एकही नेता नसल्याचे भुजबळ म्हणाले.बाळासाहेब व पवार साहेबाच्या संपर्कात आल्यानंतर मला खूप काही शिकण्यास मिळाले हे मी माझे भाग्य समजतो असे भुजबळ यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT