Chains to two wheeler thief Action by LCB dhule crime news esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : दुचाकी चोरट्याला बेड्या; ‘LCB’ ची कारवाई

दुचाकी चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्या.

सकाळ वृत्तसेवा

Dhule Crime News : दुचाकी चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून ८२ हजार रुपये किमतीच्या चार दुचाकी पथकाने हस्तगत केल्या.

या चोरट्यावर यापूर्वी देवपूर पोलिसांत अपहरणाचाही गुन्हा दाखल आहे. (Chains to two wheeler thief Action by LCB dhule crime news)

देवपूर पोलिसांत दाखल दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांचा समांतर तपास करत असताना ‘एलसीबी’चे पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना गोपनीय माहिती मिळाली.

हा गुन्हा भास्कर छगन मोरे (वय ३६, रा. कदमबांडेनगर, नगावबारी, देवपूर, धुळे) याने केला असून, त्याने गुन्ह्यात चोरीस गेलेल्या दुचाकी त्याच्या राहत्या घरी लपवून ठेवल्याची माहिती मिळाली.

या माहितीवरून एलसीबीच्या पथकाने भास्कर मोरे यास त्याच्या घरून ताब्यात घेतले. चौकशीत त्याच्याकडे चोरीच्या एकूण चार दुचाकी मिळून आल्या.

त्यांची एकूण किंमत ८२ हजार रुपये एवढी आहे. यात दोन गुन्ह्यांची उकल झाली.

पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, पोलिस उपनिरीक्षक बाळासाहेब सूर्यवंशी, अमरजित मोरे.

सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संजय पाटील, श्‍याम निकम, संतोष हिरे, मुकेश वाघ, चेतन बोरसे, पंकज खैरमोडे, शशिकांत देवरे, जितेंद्र वाघ, महेंद्र सपकाळ, गुणवंत पाटील, हर्शल चौधरी, कैलास महाजन यांच्या पथकाने ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ओमानमध्ये जहाजावर भारतीयाचा मृत्यू, प्लास्टिकमध्ये गुंडाळून थंड पाण्याच्या बाटल्यांनी झाकलं; मृतदेह सडू लागला, मदत मिळेना

Uddhav Thackeray: मातोश्रीवर बैठकीला ९ पैकी चौघेच आले, सर्वजण ठाकरेंसोबतच राऊतांचा दावा; तरीही ऑपरेशन टायगरची भीती

Latest Marathi News Live Update : नाशिक जिल्हयातील नागा-साक्या धरणाने गाठला तळ

Pune Market Yard: पुणे मार्केट यार्डमध्ये केशर आंब्याला १६७ रुपये प्रतिकिलो भाव; पाच वर्षांतील सर्वोच्च विक्रम

Thane News: थीम केक ठरला जीवघेणा! तीन वर्षांच्या चिमुकलीच्या पोटात धातूच्या पिना; ठाण्यातील खळबळजनक घटना

SCROLL FOR NEXT