traffic management  sakal media
उत्तर महाराष्ट्र

Sarangkheda Yatra : सारंगखेडा येथील यात्रोत्सवाच्या अनुषंगाने वाहतूक मार्गात बदल

सारंगखेडा येथे आजपासून (ता.२२) पुढील १० जानेवारी २०२४ पर्यंत श्री. दत्त जयंतीनिमित्त एकमुखी दत्त प्रभू यांची यात्रा भरणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

Sarangkheda Yatra : सारंगखेडा येथे आजपासून (ता.२२) पुढील १० जानेवारी २०२४ पर्यंत श्री. दत्त जयंतीनिमित्त एकमुखी दत्त प्रभू यांची यात्रा भरणार आहे.

या यात्रोत्सवात दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी जिल्ह्यासह गुजरात, मध्यप्रदेश राज्यातून भाविक मोठ्या प्रमाणात येत असतात.(Changes in traffic route in connection with yatrotsav at Sarangkheda nandurbar news)

यावेळी भाविकांची गर्दी लक्षात घेऊन वाहतुकीची कोंडी निर्माण होऊ नये, म्हणून यात्रा काळात दोंडाईचा ते शहादा रस्त्यावरील वाहतूक मार्गात बदल करून ती इतर मार्गांनी वळविण्यात आली असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधिक्षक पी.आर.पाटील यांनी दिली.

सारंगखेडा येथे भरणाऱ्या यात्रेत घोडे आणि बैलबाजार मोठ्या प्रमाणात भरत हा बाजार महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. यात्रेमुळे अंकलेश्वर-बऱ्हाणपूर मार्गावरील अवजड वाहतुकीने रहदारी खोळंबते. त्याचा परिणाम यात्रोत्सवासाठी आलेल्या भाविकांवर होत असतो. तसेच मंदिराचे परिसरात विविध खेळण्यांचे दुकान, खाण्याचे हॉटेल, स्टॉल, मनोरंजनाचे पाळणे इतर दुकाने असतात.

यात्रोत्सव दरम्यान आलेले भाविक त्यांची दुचाकी, चारचाकी मंदिराचे परिसरात लावल्यामुळे भाविकांची गैरसोय होवून त्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. यात्रोत्सव दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडे नये म्हणून पोलिस दलातर्फे वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे.

यात्रोत्सवात येणाऱ्या भाविकांनी त्यांची वाहने मंदिर परिसरात रस्त्यांवर किंवा इतरत्र पार्किंग करू नये, तसे आढळून आल्यास सदर वाहनांवर मोटार वाहन कायद्यानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची सर्व भाविकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन नंदुरबार जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी केले आहे.

असा असेल बदल

१० जानेवारीपर्यंत दोंडाईचाकडून शहादामार्गे गुजरातकडे जाणारी अवजड वाहने ही दोंडाईचा चौफुलीवरून नंदुरबार-प्रकाशामार्गे गुजरातकडे जातील, तर गुजरात राज्याकडून अक्कलकुवा-तळोदा मार्गे येणारी अवजड वाहने प्रकाशा पुलावरून नंदुरबारमार्गे दोंडाईचाकडे जातील.

शहादाकडून-दोंडाईचाकडे जाणारी अवजड वाहने शहादा-अनरद बारी, शिरपूरमार्गे व धुळेकडून शहादाकडे जाणारी अवजड वाहने सोनगीर फाट्यावरुन शिरपूर येथून वडाळी-अनरद बारीमार्गे शहादाकडे जातील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tamil Nadu Cow Slaughter Ban : सर्वोच्च न्यायालयाकडून तामिळनाडूतील 'विजय सरकार'ला दिलासा; गोहत्या बंदीबाबत मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशाला अंतरिम स्थगिती

Wimbledon 2026: यानिक सिनरचा डबल धमाका! सलग दुसऱ्यांदा उंचावली ट्रॉफी, ३ तास ४६ मिनिटांचा थरारक सामना...

Medha Manjrekar Cancer: मेधा मांजरेकरांच्या कॅन्सरवर लेक सईची पहिली प्रतिक्रिया; म्हणाली- आई तू खूप...

Latest Marathi News Live Update : जेजुरीजवळ ट्रकच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांची मदत जाहीर

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना मोठा धक्का ! ९२ लाख महिलांची नावे वगळली; 'ही' मोठी कारणे आली समोर

SCROLL FOR NEXT