Dhule: Father Wilson Rodrigues and his brothers and sisters praying at St. Anne's Catholic Church on the occasion of Christmas. In the second photo, officials of various parties and organizations including the Sarvadharma Sangha are celebrating the birth of Lord Jesus by cutting the cake esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : सर्वधर्मीयांच्या सहभागाने नाताळचा आनंद द्विगुणित

सकाळ वृत्तसेवा

धुळे : नाताळचा सण शहरात विविध कार्यक्रम, उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील विविध भागातील चर्चमध्ये प्रार्थना करत एकमेकांना शुभेच्छा दिल्या.

दरम्यान, इतर विविध संस्था, पक्ष- संघटना तसेच अन्य धर्मियांनीही कार्यक्रमांमध्ये सहभाग नोंदवत, शुभेच्छा देत नाताळ सणाचा आनंद द्विगुणित केला. सर्वधर्म संघातर्फे सेंट ॲन्स चर्चमध्ये केक कापून प्रभू येशूंचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. (Christmas natal celebrate happily in Dhule with all religious people dhule news)

ख्रिस्ती बांधवांचा सर्वात मोठा सण नाताळ रविवारी (ता.२५) मोठ्या आनंद आणि उत्साहात साजरा झाला. यासाठी गेल्या काही दिवसांपासूनच तयारी सुरु होती. शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या सेंट ॲन्स कॅथलिक चर्चसह इतर चर्चमध्ये सकाळी प्रार्थना झाली.

फादर विल्सन रॉड्रीक्स यांच्यासह ख्रिश्‍चन बंधू-भगिनी उपस्थित होते. प्रभू येशूंसमोर मेणबत्त्या पेटवून प्रार्थना करण्यात आली. उपस्थितांनी एकमेकांना नाताळ सणाच्या शुभेच्छा दिल्या.

हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

प्रेम, क्षमा हाच संदेश

सेंट अन्स कॅथॅलिक चर्चमध्ये सर्वधर्म संघातर्फे केक कापून प्रभू येशूंचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. प्रेम आणि क्षमाशीलता हाच प्रभू येशूच्या जन्माचा संदेश असल्याचे प्रतिपादन याप्रसंगी रेव्ह. फादर विल्सन राँड्रीग्ज यांनी केले. येथील गुरुद्वाराचे बाबा धीरजसिंग सर्वधर्म संघाचे प्रमुख ॲड. एम.एस. पाटील, प्राचार्य संघवी, धीरज पाटील, अतुल सोनवणे, हाजी अब्दुल करीम न्हावकर, प्रा. शरद पाटील, जोसेफ मलबारी, रमेश श्रीखंडे, रणजित भोसले, महेश मिस्तरी, डॉ. सुशील महाजन, जयश्री शहा, प्रा. किरण सक्सेना, हाजी मुनाफ अली सय्यद आदी उपस्थित होते.

प्रा. श्रीमती सक्सेना यांनी प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म आणि बालपण विशद केले. हाजी मुनाफ अली सय्यद यांनी येशू ख्रिस्ताला मसीहा का म्हणतात याचे विवेचन केले. प्रा. पाटील यांनी अशा कार्यक्रमातून सर्वधर्म समभाव जोपासला जात असल्याचे सांगितले. रेव्हरंड फादर विल्सन राँड्रीग्ज यांनी तरुणांच्या हाताला काम देण्याचे कार्य समाज घटकांनी करावे, अन्यथा त्यांच्या रिकाम्या डोक्यात सैतान संचारतो.

प्रेम भावनेने तरुणांची काळजी घेऊन त्यांना कार्यप्रवण करावे असेही आवाहन केले. शेख हुसेन गुरुजी, प्रभा निकुंभे, प्रा. डॉ. मृदुला वर्मा, अशोक बागुल, शाहीर शंकर पवार, मुरलीधर पांडे, विजयकुमार अग्रवाल, नीलेश अग्रवाल, बी. झेड. शेख, श्री. बोरसे, दत्तात्रय कल्याणकर, सुमनबाई मोरे, दिनेश मोरे, प्रा. डॉ. विजय चंद्र जाधव, सुरेश चौधरी, शेखर महाजन, हिरालाल सापे, राधेश्याम वर्मा आदी उपस्थित होते. रंजना नेवे यांनी सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup 2026 च्या सराव सामन्याचे वेळापत्रक जाहीर! ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली संघ तगड्या संघांना भिडणार

Ladki bahin Yojana : केवायसी करुनही पैसे न मिळाल्याने लाडक्या बहिणी संतप्त, शेकडो महिला थेट बालविकास कल्याण केंद्रात घुसल्या अन्...

Shadashtak Yoga 2026: 13 फेब्रुवारीला तयार होणार षडाष्टक योग! मेष राशींबरोबर 'या' 4 राशींचं नशीब उजळणार

New UPI Feature : आता अकाऊंट मध्ये पैसे नसतानाही ऑनलाइन पेमेंट शक्य! UPI च नवं फीचर पाहिलंत का? तुम्हाला काय फायदा होणार?

बांगलादेशला रिप्लेस करणाऱ्या स्कॉटलंडने T20 World Cup साठी जाहीर केला संघ! पाकिस्तानी वंशाच्या अन् न्यूझीलंडच्या माजी खेळाडूला संधी

SCROLL FOR NEXT