A delegation of the BJP Workers' Alliance giving a statement to Governor Bhagat Singh Koshyari for various demands. esakal
उत्तर महाराष्ट्र

धुळ्याचे सफाई कर्मचारी राज्यपालांकडे

सकाळ वृत्तसेवा

धुळे : विविध मागण्यांबाबत सफाई कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी भाजप कामगार आघाडीने केली. त्यासाठी शिष्टमंडळाने थेट राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची मुंबईत भेट घेत त्यांना निवेदन दिले. (Cleaning staff met governor dhule latest marathi news)

सफाई कामगारांना सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकासासाठी, सामाजिक व दर्जा उंचाविण्यासाठी, विविध सुविधा मिळण्यासाठी, तसेच त्यांच्या‍ अडचणी व त्यांच्यासाठी असलेल्या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष रामुजी पवार यांनी मेहतर, वाल्मिकी, सुदर्शन, डोम, दुमार, शेख मेहतर, मेघवाल, रूखी, मखीयार या समाजाच्या मुक्ती व पुनर्वसनासाठी २०१७- २०१८ मध्ये माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे काही शिफारशी मांडल्या.

अहवालानुसार सर्व संबंधित प्रशासकीय विभाग तथा प्राधिकरणाने त्वरित कार्यवाही करण्याबाबत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या सचिवांनी सर्व विभागांना अहवालानुसार कार्यवाही करण्याचा आदेश दिला.

मात्र, त्यावर अद्यापही कार्यवाही झाली नाही. सर्व प्रशासकीय विभागांना या आदेशाचे पालन करण्यासाठी व कार्यवाहीसाठी आदेशीत करून सफाई कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

आघाडीचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष विजय पवार, प्रदेश कायदे सल्लागार अ‍ॅड. किशोर जाधव, जिल्हाध्यक्ष सूरज अहिरराव, संघटक सरचिटणीस अन्सारी मेहमुद्दुल हसन, सदस्य हेमंत चौधरी सफाई कामगार प्रतिनिधी हिरालाल डंगोरे, मानव पवार आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sachin Yadav: नीरजलाही मागे टाकणारा कोण आहे सचिन यादव? पोलिस भरतीनंतर भालाफेक सोडण्याचा केलेला विचार, पण...

Parbhani News : अतिवृष्टीग्रस्त परभणी जिल्ह्यासाठी १२८ कोटींची आर्थिक मदत मंजूर; शेतकऱ्यांना थेट खात्यात जमा होणार नुकसानभरपाई

Latest Maharashtra News Updates : पुण्यात मुसळधार पाऊस; बाणेर-औंध रस्ता वाहतुकीसाठी अजूनही ठप्प

Pune Heavy Rain: पुण्यात मुसळधार पाऊस! रस्त्यांना नद्यांचं स्वरुप, वाहतूक ठप्प; पुणेकर खोळंबले

Parner Crime : सातबारा उताऱ्यावर नोंद लावण्यासाठी आठ हजारांची लाच घेताना कामगार तलाठ्याला रंगेहाथ पकडले

SCROLL FOR NEXT