CM
CM esakal
उत्तर महाराष्ट्र

CM Medical Insurance Scheme : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी योजना; रुग्णालयात किमान 30 रुग्णशय्या आवश्यक

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : शासनाने मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी योजनेतील नियमात बदल केले आहेत. त्यानुसार रुग्णाचे छायाचित्र आता ‘जीओ टॅग’ करूनच रुग्णालयांना सादर करावे लागेल. त्यामुळे रुग्ण केव्हा, किती वाजता, कोणत्या रुग्णालयात उपचार घेत आहे हे अचूक कळेल.

सोबतच या योजनेशी संलग्नतेसाठी रुग्णालयातील रुग्णशय्याही आता तीसवर असायला पाहिजेत, अशी माहिती जिल्हा यंत्रणेने दिली.(cm medical insurance scheme At least 30 beds are required in hospital dhule news)

गरिबांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून ‘अँजिओप्लास्टी’, ‘बायपास सर्जरी’, कर्करोगावरील उपचार, ‘डायलिसिस’, जन्मतः मूकबधिर मुलांवर ‘कॉकलीयर इंप्लांट’ सर्व प्रकारचे अवयव प्रत्यारोपण, रस्ते अथवा वीज अपघातासह भाजलेल्या रुग्णांवर उपचार, जन्मतः लहान मुलांवर हृदयशस्त्रक्रियासाठी अर्थसहाय्य केले जाते. या योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी शासनाने काही बदल केले आहेत.

योजनेत नवीन बदल

नवीन बदलानुसार आता मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीकरिता रुग्णालय संलग्न करण्यासाठी रुग्णालयात किमान ३० रुग्णशय्या आवश्यक आहेत. या योजनेत सहभागी यापूर्वीच्या रुग्णालयांनाही आता रुग्णशय्या वाढवाव्या लागणार आहेत, अथवा त्यांना योजनेतून बाहेर केले जाईल.

रुग्णालयांना स्वत:चे ‘जीओ टॅग’सह छायाचित्र देणे बंधनकारक आहे. संलग्न रुग्णालयांना योजनेतून अर्थसहाय्य प्रदान करण्यापूर्वी संबंधित कक्षाकडून भ्रमणध्वनीवर संपर्क केला जाईल. रुग्णाचे ‘जीओ टॅग’ छायाचित्र रुग्णालयांना पाठवावे लागेल. त्यातून रुग्ण रुग्णालयात केव्हा, कोणत्या वेळी उपचार घेत आहे, हे स्पष्ट होईल.

नवीन नियमांमुळे काम पारदर्शी

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीसंबंधी कामकाज नवीन नियमांमुळे आणखी पारदर्शी होणार आहे. सहाय्यता निधी मिळविणे आणखी सोपे झाले आहे. त्यासाठी मंत्रालयात जाण्याची आवश्यकता भासणार नाही.

‘सीएमएमआरएफ’ या ‘अ‍ॅप’वर अर्ज भरून मदत मिळविता येईल. इतरही काही नियमांत बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे खासगी रुग्णालयात आधीच उपचार घेऊन प्रसंगी नंतर पैसे लाटण्याचा प्रयत्न शक्य होणार नाही, असे जाणकारांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT