cm My School Beautiful School initiative started Bookless school every Saturday of week nandurbar educational news esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Educational News : आता दर शनिवारी 'दप्तराविना शाळा'

राज्यात मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा उपक्रम सुरू झाला आहे. त्याअंतर्गत आता शनिवार पासून आठवड्याच्या प्रत्येक शनिवारी दप्तराविना शाळा भरवून विद्यार्थ्यांना नावीन्यपूर्ण उपक्रमांचा माध्यमातून मार्गदर्शन केले जाणार आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar News : राज्यात मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा उपक्रम सुरू झाला आहे. त्याअंतर्गत आता शनिवार (ता.१३ ) पासून आठवड्याच्या प्रत्येक शनिवारी दप्तराविना शाळा भरवून विद्यार्थ्यांना नावीन्यपूर्ण उपक्रमांचा माध्यमातून मार्गदर्शन केले जाणार आहेत. (cm My School Beautiful School initiative started Bookless school every Saturday of week nandurbar educational news)

तसा निर्णय देखील शालेय शिक्षण विभागाकडून देण्यात आला आहे. नंदूरबार जिल्हा शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे यांनी शुक्रवारी (ता.१२) याबाबत आदेश काढून सर्व शाळांना सूचना देत उपक्रम प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश दिले आहेत.

यामध्ये प्रत्येक शाळेत नावीन्यपूर्ण पद्धतीने उपक्रम राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहे. जिल्ह्यातील सुमारे दोन हजार शाळांमधील तीन लाख विद्यार्थी या उपक्रमात सहभागी होणार आहे.

मुख्यमंत्री माझी शाळा-सुंदर शाळा अभियान काळात दर शनिवारी 'दप्तराविना शाळा भरविण्यात यावी, महावाचन महोत्सवाच्या निमित्ताने विविध उपक्रम आयोजित करावे, शिक्षकांनी आवडलेल्या पुस्तकाचा परिचय करून द्यावा.

प्रत्येक विषयाची किमान पाच पाने वाचेल याचे नियोजन करावे, प्रकट वाचनाचे नियोजन करावे, विद्यार्थी केवळ अवांतर वाचनाचे पुस्तक आणतील याचे नियोजन करावे, प्रत्येक विषयाची किमान पाच पाने वाचेल पहावे.

लेखक आपल्या भेटीला याचे आयोजन करावे, स्थानिक कवी, लेखक यास किंवा उपलब्ध लेखक, कवी यांचा विद्यार्थ्यांना परिचय करून द्यावा, माझा आवडता लेखक, कवी याविषयी विद्यार्थ्यांना लिहिते-बोलते करावे.

बुके नाहीत, बुक अभियान काळात पाहुण्यांच्या भेटीदरम्यान स्वागतासाठी आवर्जून वापरावे, पाठ्यपुस्तकातील कवितांना चाली लावून गायनाने कार्यक्रम आयोजित करावे, वाचन महोत्सवांचे निमित्त साधून कल्पकतेने स्थानिक पातळीवर विविध कार्यक्रमाचे नियोजन करावे, उर्वरित वेळेत माझी शाळा-माझी परसबाग या कार्यक्रमाचे आयोजन करावे असे कार्यक्रम सूचीत करण्यात आले आहेत.

जिल्ह्यातील सहभागी शाळा व विद्यार्थी

- शाळा : २ हजार ०७२

- विद्यार्थी संख्या : ३ लाख ४४ हजार ३४३

"शासन निर्णयाचे पालन करीत जिल्ह्यातील सर्व शाळा मुख्याध्यापकांनी याची नोंद घ्यावी, अभियान यशस्वीपणे राबवावे, गट शिक्षणाधिकारी यांनीही यासाठी योग्य नियोजन करावे, तरच अभियान यशस्वी होण्यास मदत होईल." - प्रवीण अहिरे, शिक्षणाधिकारी, नंदूरबार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv News: अतिवृष्टीमुळे नुकसान होऊन व कर्जबाजारीपणामुळे भूम तालुक्यातील शेतकऱ्याने संपवले जीवन

Ladki Bahin yojana: बहिणींसाठी ‘ई-केवायसी’ रुसली; ‘कनेक्टिव्हिटी’सह संकेतस्थळ वारंवार बंद होत असल्याने मनस्ताप

ठाण्यात सरकारी जागेवर ३ इमारती बांधल्या, बिल्डरकडून ११२ फ्लॅटधारकांची कोट्यवधींची फसवणूक

अरे वाह! 'या' मराठी अभिनेत्रीचा झाला साखरपुडा, नवरा सुद्धा आहे 'या' मालिकेतील अभिनेता, सोशल मीडियावर फोटोची चर्चा

Latest Marathi News Live Update : दादर प्लाझाजवळ भीषण अपघात, एकाचा मृत्यू,चार जखमी

SCROLL FOR NEXT