Dhule: Truck caught fire on Agra highway esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : कोळशाच्या Truckला आग; महामार्गावर Traffic Jam

सकाळ वृत्तसेवा

धुळे : कर्नाटक राज्यातून गुजरातकडे दगडी कोळसा घेऊन जाणाऱ्या धावत्या ट्रकचा टायर फुटला. त्यामुळे त्याला आग लागल्याची घटना मंगळवारी (ता. २७) सकाळी साडेदहाला मुंबई- आग्रा महामार्गावर घडली. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होऊन दुतर्फा कोंडी झाली.

वरखेडी (ता. धुळे) फाट्याजवळ ही घटना घडली. त्यावेळी इतरांनी द बर्निंग ट्रकचा थरार अनुभवला. ट्रकचालक विनोद लहाभाई व हितेश भारमल यांनी प्रसंगावधान राखून पेटलेल्या ट्रकवर (जीजे १२ बीवाय ९३९४) पाण्याचा मारा केला. (Coal Truck Fire tire burst accident Traffic Jam on the highway dhule news)

हेही वाचा : क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच...

परंतु, आग आटोक्यात येत नव्हती. घटनेत ट्रक जळून खाक झाला. त्यात लाखो रुपयांचे नुकसान झाले. तीन अग्निशमन बंबाच्या मदतीने आग विझविण्यात आली. वाहतुकीचा खोळंबा व कोंडी झाल्याने बंबांना अडथळा निर्माण झाला.

वेगवेगळ्या मार्गाने अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी पोचले. फायरमन अतुल पाटील, वाहनचालक सिद्धार्थ खैरनार, फायरमन मनोज सरगर, राहुल पाटील, राजेंद्र लहामगे, नरेंद्र बागूल, कुणाल ठाकूर, पांडुरंग पाटील यांनी स्थितीवर नियंत्रण मिळविले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Voter List: राज्यात एक कोटी मतदार वगळणार ? 'एसआयआर'मध्ये मुंबई, ठाणे, पुण्यात सर्वाधिक मतदार बाद होण्याचा अंदाज!

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात सलग दोन दिवस घसरण, आजचे भाव काय?

१३५च्या स्पीडनं स्विफ्टची ट्रकला मागून धडक, अख्खं कुटुंब संपलं; पाच जणांचा जागीच मृत्यू

Bay of Bengal Low Pressure Area : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भाला पाऊस; हवामान विभागाचा अंदाज

बुमराला अचानक विश्रांती का? अफगाणिस्तान मालिकेपूर्वी BCCI चा मोठा मास्टरप्लॅन समोर!

SCROLL FOR NEXT