Dhule Municipal Corporation esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : हद्दवाढीतील रहिवाशांना ‘दिवाळी गिफ्ट’; आयुक्तांचा निर्णय

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : महापालिकेच्या हद्दवाढ क्षेत्रातील रहिवाशांसाठी महापालिका आयुक्तांनी मालमत्ता करावरील शास्ती माफ करण्याचा निर्णय अखेर घेतला. पहिले तीन महिने शंभर टक्के शास्ती माफ होईल व त्यानंतर योजनेचा लाभ घेतला तर साधारण दीड महिना ५० टक्के शास्तीमाफीचा लाभ मिळू शकणार आहे.

या निर्णयामुळे एका अर्थाने हद्दवाढ क्षेत्रातील रहिवाशांना दिवाळी गिफ्ट मिळाले आहे. हद्दवाढ क्षेत्रात ३३ हजार मालमत्ता आहेत. यातील ज्यांनी अद्याप कर भरलेला नसेल त्यांना याचा लाभ मिळू शकरणार आहे.(Commissioner decision Diwali gift' to residents of border dhule news )

महापालिका हद्दवाढ क्षेत्रातील अकरा गावांमध्ये करवसुलीच्या अनुषंगाने असंख्य तक्रारी व रोष आहे. कोणत्याही प्रकारच्या सोयी-सुविधा नसताना महापालिकेकडून वाढीव कर लादण्यात आल्याची ओरड आहे. नागरिकांसह नगरसेवक, राजकीय पदाधिकाऱ्यांनी याबाबत वेळोवेळी तक्रारी केल्या. दरम्यान, या प्रश्‍नावर अद्याप काहीही तोडगा निघालेला नाही.

दरम्यान, किमान हद्दवाढ क्षेत्रासाठी शास्तीमाफी योजना जाहीर करून दिलासा द्यावा, अशी मागणी पुढे आली. या मागणीवर बुधवारी (ता. ८) महासभेत चर्चाही झाली. महासभेतील चर्चा व कार्यालयीन टिपणी याचा विचार करून आयुक्त अमिता दगडे-पाटील यांनी हद्दवाढ क्षेत्रासाठी शास्तीमाफी योजना अखेर जाहीर केली आहे.

या कालावधीत लाभ

१६ नोव्हेंबर २०२३ ते १५ फेब्रुवारी २०२४ दरम्यान १०० टक्के शास्तीमाफीचा लाभ घेता येईल. त्यानंतर १६ फेब्रुवारी २०२४ ते ३१ मार्च २०२४ दरम्यान मात्र ५० टक्के शास्तीमाफी मिळेल. हद्दवाढ क्षेत्रातील रहिवाशांनी योजनेचा लाभ घ्यावा, मालमत्ता कराची संपूर्ण रक्कम भरून महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महापौर प्रतिभा चौधरी, आयुक्त श्रीमती दगडे-पाटील यांनी केले आहे.

हद्दवाढीत ३३ हजार मालमत्ता

हद्दवाढ क्षेत्रात वलवाडी, भोकर, नकाणे, महिंदळे, वरखेडी, अवधान, चितोड, नगार बुद्रुक, मोराणे, बाळापूर, पिंपरी या गावांचा समावेश आहे. या अकरा गावांमध्ये सुमारे ३३ हजार मालमत्ता आहेत. त्यामुळे यातील ज्या थकबाकीदार मालमत्ताधारकांनी अद्याप मालमत्ता कर अदा केला नसेल त्यांना या शास्तीमाफीचा लाभ घेता येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT