Girish-Mahajan
Girish-Mahajan 
उत्तर महाराष्ट्र

रॅगिंगला आळा घालण्यासाठी त्रिसदस्यीय समिती

सकाळवृत्तसेवा

डॉ. तात्याराव लहाने, डॉ. दिलीप म्हैसेकर, डॉ. हेमंत देशमुख यांचा समावेश
नाशिक - मुंबईच्या नायर रुग्णालय वसतिगृहात जळगावच्या पायल तडवी या शिकाऊ डॉक्‍टरने रॅगिंगला कंटाळून आत्महत्या केल्याने वैद्यकीय शिक्षण विभाग धास्तावला आहे. प्रतिबंधक कायदा असूनही रॅगिंग होत असल्याने हा विभाग चक्रावला आहे. रॅगिंगला आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक तरतुदी करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने यांच्या अध्यक्षतेखाली वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी त्रिसदस्यीय समिती स्थापन केली.

आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर, मुंबईच्या केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांचा समितीत समावेश आहे. वैद्यकीय शिक्षणातील विद्यार्थी आणि अध्यापक यांच्यात संवाद राहिला नसल्याने रॅगिंगच्या घटना घडत असल्याची बाब वैद्यकीय शिक्षण विभागाच्या निदर्शनास आल्याने कायद्यात दुरुस्ती करीत असताना दोषींविरुद्ध कडक कारवाई करणे आणि सहा महिन्यांतून एकदा समुपदेशन करणे, या बाबींचा कायद्यातील तरतुदींत समावेश करण्यासंबंधी ही समिती विचारविनिमय करणार असल्याची माहिती महाजन यांनी "सकाळ'ला दिली.

पायलच्या आत्महत्येची चौकशी करण्यासाठी मुंबई महापालिकेने समिती स्थापन केली आहे. शहरी आणि ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव होत असल्याची बाब पायलच्या आत्महत्येने अधोरेखित झाली. त्या अनुषंगाने नेमकी काय कारवाई केली, यासंबंधीचा अहवाल चार दिवसांत मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांच्याकडून महाजन यांनी मागितला. रॅगिंगच्या घटनांविषयीची कारवाई आरोग्य विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण सेवा विभागातर्फे केली जाते. त्यामुळे पायलच्या आत्महत्येचा घटनेची दखल विद्यापीठ कशी घेणार, याकडे वैद्यकीय विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचे लक्ष लागले आहे.

पायल तडवी हिच्या आत्महत्येप्रकरणी पोलिस तपास करीत आहेत. त्याचवेळी समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती पुढील निर्णय घेईल. मात्र, वैद्यकीयच्या पदव्युत्तर शिक्षणात अशी घटना पहिल्यांदा घडल्याने रॅगिंग कायद्यात बदलासंबंधी स्थापन करण्यात आलेल्या समितीतर्फे उपाययोजना आणि तरतुदींचा अहवाल सरकारला सादर केला जाईल.
- डॉ. तात्याराव लहाने, वैद्यकीय शिक्षण संचालक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT Live Score: बेंगळुरूचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने जिंकला टॉस; गुजरातच्या प्लेइंग-11 मध्ये मोठे बदल

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

MPSC : मुख्य परीक्षा होऊन चार महिने झाले तरी निकाल लागेना; गट क संवर्गातील ७ हजार ५१० उमेदवारांचे भवितव्य टांगणीला

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

Akshaya Tritiya 2024 : कुंडलीतील पितृदोष दूर करण्यासाठी अक्षय्य तृतीयेला करा हे उपाय, घरात नांदेल सुख-शांती 

SCROLL FOR NEXT