manmad
manmad 
उत्तर महाराष्ट्र

नांदगाव तहसील कार्यालयातील निवडणूक विभागात गोंधळ

सकाळवृत्तसेवा

मनमाड - नांदगाव तहसील कार्यालयातील निवडणूक विभागात पुरता सावळा गोंधळ सुरू असून, मनमाडच्या मतदारांना देण्यात येणारे मतदार फोटो ओळखपत्र चुकीचे दिले जात आहे. चक्क  फोटो एकाचा तर नाव दुसऱ्याचे असल्याने मतदारांना मनस्ताप सहन करावा लागत असून, दुरुस्तीसाठी पुन्हा हेलपाटे मारण्याची वेळ आली आहे. 

पुढील वर्षी २०१९ मध्ये विधानसभा निवडणूक होणार असल्याने नांदगाव तहसील कार्यालयात असलेल्या निवडणूक आयोगाच्या निवडणूक विभागात नवीन मतदारांचे नावे समाविष्ठ करणे, मतदार ओळखपत्र तयार, मतदार याद्या सुरू करण्याचे काम सुरू आहे. मात्र या विभागात सध्या पुरता सावळा गोंधळ सुरू आहे या विभागाकडून मनमाड शहरात बीएलओ नेमण्यात आले आहे. नगर पालिकेचे पाणीपुरवठा विभाग, घरपट्टी विभागातील कर्मचारी बीएलओ म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. शहरात सध्या नवीन मतदारांची नावे मतदार म्हणून नोंदविण्याचे कामे सुरू असून, बीएलओ नी शहरात नेमून दिलेल्या विभागात फिरून नवीन मतदारांचे फॉर्म भरून घेतले आहे. तर मागे ही अनेकांचे फॉर्म भरून घेण्यात आले होते. तर ज्यांना मतदार ओळ्खपत्र नाही त्यांचेही ओळ्खपत्र तयार करण्यात आले आहे. या सर्वांचे सध्या नवीन मतदार ओळखपत्र तयार करण्यात आले आहे. सध्या देण्यात येणारे हे ओळखपत्र नवीन प्रकारचे असून, पूर्वीसारखे काळ्या रंगाचा नाही तर रंगीत आहे. शहरातील अनेक मतदारांचे मतदार फोटो ओळखपत्र तयार झाल्याने नांदगाव तहसीलच्या निवडणूक विभागातर्फे बीएलओ ना वाटप करण्यात आले आहे. बीएलओ नी हे मतदार ओळखपत्र वाटप केले आहे. मतदारांनी नावाप्रमाणे ओळखपत्र घेतल्यावर त्यांना धक्काच बसतो चक्क एकाचा फोटो तर दुसऱ्याचे नाव असल्याने अनेक मतदारांनी संताप व्यक्त केला आहे हा प्रकार सर्वच ठिकाणी असल्याचे नागरिक मतदार तक्रारी करत आहे. 

फोटो महादेवराव मोतीराम बहादूरे यांचा आहे .तर नाव आहे माधव किसन सांगळे यांचे अशी चुकीच्या फोटोची नावांची ओळखपत्र वाटप केल्याने या चुकांचा बीएलओ यांना अधिक त्रास सहन करावा लागत आहे 

ओळखपत्र तयार करणारे कर्मचारी निट काम करत नसल्याने या चूका होत आहे. निवडणूक काळात नाव चुकलेले, फोटो चुकलेले मतदार ओळखपत्र असल्यावर या निवडणूक विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून मतदान करून दिले जात नाही मग आता ही चुकीची ओळखपत्रे दिले जात आहे. त्याचे काय करायचे असा संतप्त सवाल मतदारांनी उपस्थित केला आहे ज्यांनी ही चुकीची ओळखपत्रे तयार केली त्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करून कोणताही अर्ज, फॉर्म न भरून घेता पुन्हा मतदारांना मतदार फोटो ओळखपत्र दुरुस्ती करून देण्यात यावे अशी मागणी मतदारांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

Waluj Nagar Accident : हळद लागण्यापूर्वीच काळाने घातली झडप, दुचाकीच्या अपघातात तरुण ठार

IPL 2024, KKR vs DC Live Score: कोलकाताने गमावली तिसरी विकेट, रिंकू सिंग स्वस्तात झाला आऊट

''सत्तेत आल्यास जातनिहाय आणि आर्थिक सर्वेक्षण करू.. राज्य घटना बदलण्याचा भाजप आणि संघाचा कट'', काय म्हणाले राहुल गांधी?

Satara : कऱ्हाडला घुमला 'मोदी...मोदी'चा नारा; महायुतीच्या नेत्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन, रखरखत्या उन्हातही मोठा उत्साह

SCROLL FOR NEXT