Superintendent of Police Sanjay Barkund inspecting the seized gutkha. Neighboring Assistant Inspector Jayesh Khalane, Sub-Inspector Sandeep Patil and colleagues. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : महामार्गावर 65 लाखांच्या गुटख्याने भरलेला कंटेनर जप्त; एकाला अटक

सकाळ वृत्तसेवा

Dhule Crime News: मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर हाडाखेड (ता. शिरपूर) येथे दीडशे पोती गुटख्याची वाहतूक करणारा कंटेनर सांगवी पोलिसांनी जप्त केला. सोमवारी (ता. २) रात्री एकला केलेल्या कारवाईत ६४ लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला असून, एकाला अटक करण्यात आली.

कारवाईनंतर पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांनी सांगवी येथे भेट देऊन पोलिसांचे कौतुक करीत दहा हजार रुपयांचे पारितोषिक जाहीर केले.(container of tobacco worth 65 lakh seized on highway dhule crime news)

सांगवीचे सहाय्यक निरीक्षक जयेश खलाणे यांना गुटख्याच्या तस्करीबाबत माहिती मिळाली होती. त्यांनी उपनिरीक्षक संदीप पाटील, हवालदार संजय माळी, पोलिस नाईक संदीप ठाकरे, हवालदार अल्ताफ मिर्झा यांना सोबत घेऊन हाडाखेड सीमा तपासणी नाक्यावर सापळा रचला.

मध्य प्रदेशाकडून शिरपूरकडे येणाऱ्या कंटेनर (आरजे ११, जीसी २८०९)ला थांबवून तपासणी केल्यावर गुटख्याचा दर्प येणारी पोती भरलेली आढळली. चालक अजितसिंह अमरसिंह (वय ३५, रा. नागलादाली, ता. सदाबाद, जि. महामायानगर, उत्तर प्रदेश) याला ताब्यात घेऊन कंटेनर सांगवी पोलिस ठाण्यात नेण्यात आला.

जप्त पोत्यांची तपासणी केल्यावर त्यात गुटखा आढळला. कंटेनरसह मुद्देमालाची एकूण किंमत ८९ लाख ३५ हजार रुपये आहे. अन्नसुरक्षा अधिकारी किशोर बाविस्कर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहाय्यक निरीक्षक खलाणे तपास करीत आहेत.

पोलिस अधीक्षकांकडून कौतुक या कारवाईची माहिती मिळाल्यानंतर पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांनी सांगवी येथे भेट दिली. जप्त मुद्देमालाची पाहणी त्यांनी केली. या कारवाईबद्दल सहाय्यक निरीक्षक जयेश खलाणे व सहकाऱ्यांचे विशेष कौतुक करून त्यांनी दहा हजार रुपयांचे पारितोषिक देण्याची घोषणा केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : श्रीवर्धन मधील बोर्ली पंचतन परिसरात एसटीला अपघात

SCROLL FOR NEXT