उत्तर महाराष्ट्र

धुळ्यात धडकी भरवणारी गर्दी ! कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढती

रमाकांत घोडराज

धुळे : एकीकडे जिल्ह्यात त्यातही धुळे शहरात कोरोना विषाणू संसर्गाने बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांसह संपूर्ण शासकीय यंत्रणा नागरिकांना दक्षता घेण्याचे, गर्दी टाळण्याचे आवाहन करत आहे. मात्र, या आवाहनाला केराची टोपली दाखवत, प्रशासनाच्या आवाहनाला न झुगारत वागत असल्याचे चित्र धुळे शहरात पाहायला मिळत आहे. शिवाय महापालिका प्रशासनाने देवपूर भागात दर बुधवारी भरणारा दूधबाजार गर्दीमुळे बंद केला, तर दुसरीकडे आठवडाभर आग्रा रोड, पाच कंदील व परिसर गर्दीने तुडुंब आहे. 

कोरोनाचा हा कहर रोखण्यासाठी प्रशासनाने रात्री आठलाच दुकाने बंद करण्याचा तसेच दुकानांत गर्दी होणार नाही, मंगल कार्यालयांमध्ये ५० पेक्षा जास्त व्यक्तींची उपस्थिती राहणार नाही, यादृष्टीने आदेशही काढला. प्रशासनाच्या या आवाहनाचा, आदेशाचा नागरिकांवर काहीही परिणाम होत नसल्याचे चित्र धुळे शहरात आहे. शहरातील मुख्य बाजारपेठेच्या आग्रा रोड, पाच कंदील व परिसरात रोजच गर्दी वाढत आहे. सण-उत्सवाला गर्दी असते, तशी गर्दी सध्या असल्यामुळे कोरोना विषाणू संसर्गाला नागरिकच निमंत्रण देत आहेत, असे म्हणायची वेळ आली आहे. 

पाच शिक्षक पॉझिटिव्ह 
शहरातील चितोड रोडवरील समता माध्यमिक विद्यालयात पाच शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यामुळे ही शाळा सात दिवसांसाठी बंद केली. तर शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांची ॲन्टिजेन चाचणी निगेटिव्ह आल्यामुळे पालकांचा जीव भांड्यात पडला. नगरसेवक अमोल मासुळे यांनी तातडीने महापालिकेच्या आरोग्य पथकाला बोलावून शाळेची इमारत व परिसर सॅनिटाइझ करून घेतला. संस्थेचे अध्यक्ष एम. बी. शिरसाट, मुख्याध्यापिका एच. डी. पाटील, शिक्षक ए. टी. शाह, ए. एम. शिंदे, ए. बी. पाटील, बाळू वराडे, एम. आर. बागूल आदी उपस्थित होते. 


पोलिसांनाही दंड 
मास्कची सक्ती करणाऱ्या पोलिसांकडूनच नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आल्याने पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांनी शुक्रवारी (ता.५) बेजबाबदार पोलिस कर्मचाऱ्यांवरही कारवाईचा बडगा उचलण्याचा आदेश दिल्याने पोलिस मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक नितीन देशमुख यांनी विनामास्क फिरणाऱ्या आठ पोलिस अधिकारी व अंमलदारांवर दंडात्मक कारवाई करत त्यांना मास्कही दिले. जिल्हा न्यायालय, तहसील कार्यालय परिसरातही विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली. 

संपादन- भूषण श्रीखंडे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Marks Verification : एमपीएससी उमेदवारांसाठी मोठी बातमी! गुणपडताळणीसाठी अर्जाची संधी; जाणून घ्या अंतिम तारीख

सौदी अरेबियाच्या संरक्षणासाठी पाकिस्तान 'येमेन'मधील हुथी बंडखोरांवर एअरस्ट्राईक करण्याच्या तयारीत; करार काय सांगतो?

Karmad News : आईच्या मामाच्या गावाला आलेल्या एकुलत्या एक मुलाचा शेततळ्यात बुडून मृत्यू

EPF Advance Rules : पीएफ खात्यातून पैसे काढायचे आहेत? आधी समजून घ्या नियम, कोणाला किती रक्कम मिळणार?

Marathi News Live Updates : बालासोरच्या जंगलातून सुखरूप वाचवण्यात आलेल्या पाच ओरंगुटानच्या पिल्लांना भुवनेश्वरमधील नंदनकानन प्राणीसंग्रहालयात

SCROLL FOR NEXT