उत्तर महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे नंदुरबार जिल्हयातील दुर्गम भागात कोरोनाचा फैलाव

धनराज माळी

 नंदुरबार : कोरोना लसिकरणाचा आढावा घेण्यासाठी आलेले मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या दौऱ्यामुळे जिल्हयातील जनतेला आरोग्य सोयीसुविधेच्या बाबतीत मोठया अपेक्षा होत्या. परंतु त्या फोल ठरल्या. कुठलीही महत्वपुर्ण घोषणा झाली नाही उलट मुख्यमंत्रयांचा दौऱ्यामुळेच दुर्गम भागात कोरोनाचा फैलाव झाल्याची गंभीर टिका भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी केली.

नंदुरबार जिल्हयातील सध्याची कोरोना परीस्थीती व पुर्णता: संचारबंदी बाबत जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी पक्षाच्या विजयपर्व कार्यालयात पत्रकार परीषद घेतली त्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले, मोलगी व धडगांव येथे कोरोना लसीकरणाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्रयांनी जिल्हयाचा दौरा केला होता. या दौऱ्यानिमित्त नागरीकांना मोठया अपेक्षा होत्या. परंतु, त्या फोल ठरल्या कोरोना परीस्थीतीबाबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे सर्वसामान्यांसाठी मदतीची घोषणा करतील असे वाटत होते. आरोग्य सुविधेत बदल होईल असी अपेक्षा होती. जिल्हयातील रुग्णालयांमध्ये कोरोना उपाययोजनासाठी डॉक्टर, नर्सेस व आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या वाढेल पण तसे काही झाले नाही. जिल्हाध्यक्ष विजय चौधरी पुढे म्हणाले की, यापुर्वी कोरोना बाधीत रुग्णांच्या परीसरात आरोग्य विभागाकडुन विशेष उपाययोजना केल्या जात होत्या. आता परीसर निर्जंतुकीकरण सुध्दा केला जात नाही. रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची ट्रेसिंग केली जात नाही. रुग्णांच्या घरापर्यंत रुग्णवाहीकेची सुविधा केली जात नाही. असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
 

सरकारच्या दुर्लक्षामुळे मृत्युदर वाढला
मुख्यमंत्री यांच्या दौऱ्यावर लाखों रुपयांचा खर्च होतो. परंतु कोरोनाचा अटकाव करण्यासाठी जिल्हा रुग्णालयात वेंटीलेटर, बेडची सुविधा होत नसल्याने महाआघाडी सरकार रुग्णांना वाऱ्यावर सोडत आहे. त्यामुळे कोरोना मृत्युदर वाढल्याचा आरोप जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी केला.

आवर्जून वाचा- मला 'ईडी'च्या तारखा पाहून कोरोना होत नाही'

 
आर्थिक मदतीची तरतुद करावी

जिल्हयात प्रशासनाने 1 एप्रिल ते 15 एप्रिल पर्यंतचे आदेश दिले आहेत. संचारबंदीमुळे व्यवसायिक, व्यापारी, हातावर पोट भरणारे, मजुर कामगार यांना आर्थिक झळ पोहचणार आहे. संचारबंदीला आमचा मुळीच विरोध नाही. पण, प्रशासनाने आर्थिक मदतीची तरतुद करावी.

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Government Circular : राज्य सरकारचा मोठा निर्णय! दहीहंडीची सुट्टी रक्षाबंधनाला जाहीर, शुद्धीपत्रक जारी

Bhimashankar Temple: भाविकांसाठी मोठी बातमी! श्रावणात भीमाशंकर मंदिर पहाटे ५ ते रात्री ९.३० पर्यंत खुले राहणार; ऑनलाइन बुकिंग

IND vs SL Test : श्रीलंकेने कसोटी संघ का जाहीर केलेला नाही? दोन खेळाडूंनी वाढवली डोकेदुखी; ४ दिवसावर पहिली कसोटी अन्...

Marathi News Live Updates : नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या अस्थी भारतात आणण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयाची केंद्राला नोटीस

Almatti Dam Water Level : आलमट्टी धरण 100 टक्के भरण्याच्या मार्गावर! 24 तासांत 89 हजार क्युसेकने पाण्याची आवक; पाणीसाठा 119 टीएमसीवर...

SCROLL FOR NEXT