उत्तर महाराष्ट्र

नंदूरबार जिल्ह्यात कोरोना लसीकरणासाठी सात केंद्रे कार्यान्वित; १६ जानेवारीपासून लसीकरण

धनराज माळी

नंदुरबार : जिल्ह्यातील कोविड १९ लसीकरणासाठी फ्रंट वॉरियर्समधील आतापर्यंत शासकीय व खासगी क्षेत्रातील ११ हजार ८६० आरोग्य अधिकारी-कर्मचाऱ्यांनी नोंदणी केली आहे. १६ जानेवारीपासून लसीकरण मोहिमेस प्रारंभ होत असून, त्यासाठी जिल्ह्यात सात लसीकरण केंद्रे सज्ज झाली आहेत. दररोज एका केंद्रावर प्रत्येकी १०० व्यक्तींचे लसीकरण होणार आहे. 

जिल्हाधिकारी कार्यालयात लसीकरणाबाबत मंगळवारी (ता. १२) प्रशिक्षण झाले. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड अध्यक्षस्थानी होते. या वेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रघुनाथ भोये, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. नितीन बोडके, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. के. डी. सातपुते उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. भारुड म्हणाले, की कोविड लसीकरण मोहीम यशस्वितेसाठी सूक्ष्म नियोजन करावे आणि त्यासाठी नोंदणी न झालेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी त्वरित पूर्ण करावी. जिल्ह्यात कोरोना नियंत्रणासाठी आरोग्य सुविधांच्या बळकटीकरणावर सर्वाधिक भर दिला आहे. विविध प्रकारच्या आरोग्य सुविधांची निर्मिती कोरोनाकाळात केली आहे. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी उत्तम काम केले असून, लसीकरण मोहिमेसाठी नियोजनबद्ध काम करावे. लसीकरणासाठी निश्चित केलेल्या केंद्रावर लसीकरण होणाऱ्या खासगी व शासकीय आरोग्य कर्मचाऱ्यांची यादी प्रदर्शित करावी. तसेच फलकाद्वारे लसीकरणाची माहिती द्यावी. लसीकरण केंद्रावर शीतपेटीची व्यवस्था आणि लसीची वितरण व्यवस्था योग्य प्रकारे करावी. शीतपेटीचा उपयोग केवळ कोविड लसीसाठी करावा, उपयोग झाल्यानंतर तिचे संपूर्ण निर्जंतुकीकरण करून इतर कामांसाठी वापरावी.

प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय लसीकरणासाठी कर्मचाऱ्यांना आणण्यासाठी वाहनाची सुविधा करावी. आरोग्य केंद्रावरील अधिकारी-कर्मचाऱ्यांचे दोन सत्रात लसीकरण करावे. प्रत्येक आरोग्य अधिकारी-कर्मचाऱ्याचे लसीकरण होईल, यासाठी आवश्यक दक्षता घ्यावी. लसीकरण केंद्रावर मनुष्यबळाचे योग्य नियेाजन करावे. प्रत्येक दिवशी लसीकरण झाल्यानंतर त्या ठिकाणचे निर्जंतुकीकरण करावे. या संपूर्ण प्रक्रियेसाठी प्रशासनाचे संपूर्ण सहकार्य राहील, अशी ग्वाही डॉ. भारूड यांनी या वेळी दिली. डॉ. भोये यांनी लसीकरणाबाबत शासनाच्या मार्गदर्शक सूचनांविषयी माहिती दिली. 


या केंद्रावर होणार लसीकरण 
जिल्हा शासकीय रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र आष्टे, अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालय, धडगाव ग्रामीण रुग्णालय, म्हसावद ग्रामीण रुग्णालय तसेच नवापूर आणि तळोदा उपजिल्हा रुग्णालय अशा सात ठिकाणी लसीकरण होणार आहे. 

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Name Symbol Row : 'तृणमूल'मधील दोन्ही गटांना निवडणूक आयोगाची नवी ओळख; ममता गटाला फुटबॉलपटू, तर बंडखोर गटाला मिळाले 'लिफाफा' चिन्ह

Girl Chasing Abhishek Sharma: अभिषेक शर्माच्या दिशेने पळाली तरुणी; रडली, ओरडायला लागली... हॉटेलमध्ये नेमकं काय घडलं? Video

Chandrashekhar Bawankule : दुष्काळावर शरद पवारांनी राजकारण करू नये; बावनकुळेंचे प्रत्युत्तर, म्हणाले ‘सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी’

Sunil Prabhu Car Accident: मोठी बातमी! ठाकरे सेनेच्या आमदाराच्या कारने पादचाऱ्याला उडवलं, एक जण जखमी

iPhone 18 Sale in India: पत्नीला iPhone 18 Pro द्यायचा होता; दिल्लीच्या व्यक्तीने चक्क सोनंच विकलं!

SCROLL FOR NEXT