उत्तर महाराष्ट्र

Dhule Cotton Disease : कपाशीवर लाल्या रोगाच्या प्रादुर्भावात वाढ; हातातोंडाशी आलेला घास वाया जाण्याची भीती

सकाळ वृत्तसेवा

Dhule Cotton Disease : दीड महिन्यापासून पावसाने दडी मारली होती. गेल्या चार दिवसांपासून परिसरात पाऊस जोरदार हजेरी लावत आहे. त्यामुळे शिंदखेडा तालुक्यातील ऐन वेचणीवर आलेल्या कपाशी पिकाला फटका बसला आहे.

दरम्यान, लाल्याचा प्रादुर्भाव वाढल्याने हजारो हेक्टर कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे.

तालुक्यात सुमारे २० हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर बागायतदार शेतकऱ्यांनी, ५० हजारांवर कोरडवाहू शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली आहे.

(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)

जेमतेम विहिरीच्या पाण्यावर बागायतदार शेतकऱ्यांनी लहान बाळाप्रमाणे देखरेख करून कपाशीचे पीक उभे केले. गेल्या तीन साडेतीन महिन्यांच्या कालावधीत पावसाचे प्रमाण अत्यल्प होते.

बी-बियाणे, खते, फवारणी, निंदणी, कोळपणीसाठी शेतकऱ्यांनी भांडवल व्याजदराने उपलब्ध केले. दरम्यान, गेल्या दीड महिन्यापासून पावसाने दडी मारली होती. त्यामुळे दुष्काळीसदृश परिस्थितीत निर्माण झाली आहे. आता चार दिवसांपासून पाऊस रोज दमदार हजेरी लावत आहे. सध्या कापूस काढणीला आला आहे.

कापसाची बोंडे पक्की झाली आहेत. काही शेतकऱ्यांचा कापूस वेचणीला आला आहे. पावसामुळे बोंडे काळी पडू लागली आहेत. वेचणीला आलेला कापूस खराब होऊ लागला आहे, तर लाल्या रोगाचा प्रादुर्भावाही वाढला आहे.

नवीन फुलभौरीची गळ होत वाढ खुंटली आहे. त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. बागायतदार कापूस उत्पादक शेतकऱ्यांना पाऊस येऊनही नुकसान सहन करावे लागणार आहे, तर कोरडवाहू कपाशीची दीड महिन्यापासून पाऊस नसल्याने वाढ खुंटली आहे.

नदी-नाले अद्याप कोरडेठाक पडले आहेत. खरीप वाया गेला तर रब्बीसाठी जोरदार पावसाची आवश्यकता आहेच; परंतु सध्या काढणीस आलेल्या कापसाचे होणाऱ्या पावसामुळे नुकसान सहन करावे लागत आहे.

"विमाधारक शेतकऱ्यांना हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे झालेले नुकसानभरपाईसाठी सर्वेक्षण केले जात आहे. २५ टक्के अग्रिम रकमेसाठी अहवाल तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. कपाशी पिकावरील लाल्या रोग, कीडनियंत्रणासाठी शास्त्रज्ञांमार्फत मार्गदर्शन कळविले जाईल." -एस. पी. तवर, तालुका कृषी अधिकारी, शिंदखेडा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dream11 ची माघार, मग टीम इंडियाचा स्पॉन्सर कोण? Toyota सह तगडी कंपनी शर्यतीत; आशिया चषकापूर्वी BCCI ला लागणार लॉटरी?

Latest Marathi News Updates: गोरक्षका विरुद्ध कारवाई करण्यासाठी आमदार सदाभाऊ खोत पुण्यातील सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये दाखल

गोविंदाच्या पत्नी सुनिताच होतं दुसऱ्या अभिनेत्यावर क्रश, कबुली देत म्हणाली...'गोविंदा त्याच्यासारखा दिसायचा म्हणून...'

Adventure ट्रेकिंगसाठी शोधताय खास ठिकाण? अरुणाचल प्रदेशातील 'या' आयो व्हॅली ट्रेकचा अनुभव घ्या!

Hartalika Vrat 2025 Puja Samagri: अखंड सौभाग्यासाठी हरतालिका व्रत; पूजेसाठी लागणारे साहित्य व विधीची संपूर्ण माहिती वाचा एकाच क्लिकवर!

SCROLL FOR NEXT