Team present with liquor seized by LCB. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : कारसह पावणेतीन लाखांचा देशी दारूसाठा साक्रीतून जप्त

सकाळ वृत्तसेवा

धुळे : येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सापळा रचत साक्री शहरात देशी दारूची चोरटी वाहतूक रोखली. कारसह पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच हॉटेल व्यावसायिकासह दोघांना ताब्यात घेतले. (Country Liquor worth Rs 3 Lakh along with car seized from Sakri Dhule Crime News)

साक्रीत एकजण साथीदारासह वाहनाने पिंपळनेर ते साक्री रस्त्यावरुन देशी- विदेशी दारु चोरट्या विक्रीच्या उद्देशाने वाहतूक करीत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली. त्यानुसार पथकाने गुरुवारी (ता. १५) पहाटे पावणेतीनच्या सुमारास साक्रीतील साक्री-पिंपळनेर रस्त्यावरील भाडणे फाटा येथे सापळा रचला. संशयित इंडिगो (एमएच ०१ सीजे ०५५६) पिंपळनेरकडून येताना दिसताच थांबविली. वाहनातील दोघांना ताब्यात घेतले.

हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

वाहनचालक श्रीराम मोतीराम बाबर (रा. सुभाष चौक, आदर्श शाळेसमोर, साक्री) याने हॉटेल व्यवसाय करत असल्याचे सांगितले. त्याच्या साथीदाराने विकास ऊर्फ कालू चरणदास गौड (रा. सुभाष चौक, बाजारपेठ, साक्री) असे नाव सांगितले. वाहनाची तपासणी केली असता देशी दारु मिळाली. दोन लाखांची कार व ६७ हजारांची देशी दारुच्या बाटल्यांचे १९ बॉक्स, असा दोन लाख ६७ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

पोलिस कर्मचारी राहुल सानप यांच्या फिर्यादीवरुन साक्री पोलिस ठाण्यात दोघांविरूद्ध गुन्हा दाखल झाला. ही कारवाई पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, योगेश राऊत, संजय पाटील, रफिक पठाण, श्रीकांत पाटील, प्रभाकर बैसाणे, संदीप सरग, योगेश चव्हाण, राहुल सानप, तुषार पारधी, मयुर पाटील, राजू गिते यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ज्येष्ठ नागरिक आक्रमक! 'डीजेमुक्त सोलापूरसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा'; डीजेग्रस्तांचा आवाज जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्तांच्या कानावर

Vice President Election 2025 : बहुमत नाही म्हणून एनडीएची विरोधी पक्षांना मतदानाची विनंती; उद्धव ठाकरेंच्या खासदाराचा दावा

Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मिरची होती का? जेवणात काय झणझणीत वापरत होते?

Bail Pola Festival 2025: आज आवतण घ्या, उद्या जेवायला या; खांदेमळणीने सुरू होणार कृषी संस्कृतीचा उत्सव बैलपोळा

Panchganga River : पंचगंगा नदी धोका पातळीपासून ३ इंच दूर; बावडा-शिये मार्ग बंद, नदीकाठी सतर्कतेचा इशारा, 'या' मार्गांवर वाहतूक बंद

SCROLL FOR NEXT