Crime against bribery Talathi Kotwal and 3 people dhule bribe crime news esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Bribe Crime : लाचखोर तलाठी, कोतवालासह तिघांविरूध्द निजामपूरला गुन्हा; शेतीची खातेफोड अंगलट

सकाळ वृत्तसेवा

Dhule Bribe Crime : दहा हजाराची लाच घेतल्या प्रकरणी नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने तलाठी, कोतवालासह संशयित तिघांविरूध्द निजामपूर पोलिस ठाण्यात बुधवारी रात्री गुन्हा दाखल केला. (Crime against bribery Talathi Kotwal and 3 people dhule bribe crime news)

जैताणे (वय ४५, ता. साक्री, जि. धुळे, ह. मु. तळोदा, जि. नंदुरबार) येथील तक्रारदाराने दिलेली तक्रार आणि लाच घेतल्याने तलाठी तथा सध्या तामथरे (ता. शिंदखेडा) येथील मंडळाधिकारी ज्योती के. पवार (वय ३५, सजा- रोजगाव, रा. निजामपूर, ता. साक्री), संगणक ऑपरेटर योगेश कैलास सावळे (वय २५, सजा- रोजगाव, रा. उमर्डी, ता. साक्री), कोतवाल छोटू भिकारी जाधव (वय ४५, सजा व रा. जैताणे, ता. साक्री) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला.

या संशयितांनी १८ मेस तक्रारदाराकडे वीस हजारांची लाच मागितली, नंतर तडजोडअंती १५ हजार रूपये ठरले, पुन्हा २९ मेस तडजोडअंती दहा हजार रूपयांचे देणेघेणे ठरले.

तक्रारदाराचे वडिल व भावाच्या नावाने रोजगाव येथील शिवारात सर्व्हे क्रमाक १५५/६२ व १५५/६३ या क्षेत्रात शेती आहे. तिची खातेफोड करून तीन भावांच्या नावाने सातबारा करून देण्याच्या मोबदल्यात संशयित तिघांनी ४० हजाराच्या लाचेची मागणी केली.

तक्रारदाराकडून दहा हजार व मार्चमध्ये तक्रारदाराच्या वडिलांकडून दहा हजार, असे एकूण वीस हजार रूपये काम करून देण्याच्या मोबदल्यात अगोदरच घेतले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

नंतर १८ एप्रिलला तक्रारदाराने नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात तक्रार दिली. पंच, साक्षीदारासमक्ष पडताळणी केली असता तलाठी ज्योती पवार हिने खातेफोडच्या मोबदल्यात उर्वरित २० हजाराची, नंतर तडजोडीअंती १५ हजाराच्या लाचेची मागणी केली. त्याच दिवशी तक्रारदार संशयित पवार हिला लाचेची रक्कम देण्यास गेले असता त्या मिळून आल्या नाहीत.

परंतु, कार्यालयातील संगणक ऑपरेटर संशयित योगेश सावळे याने तक्रारदाराला पैसे आणलेत का, अशी विचारणा केली. मग २९ मेस सापळा रचल्यानंतर संशयित सावळे व संशयित कोतवाल जाधव याने संशयित तलाठी पवार हिला सांगितल्याने जैताणे येथील तक्रारदाराच्या घरी लाचेची रक्कम घेण्यासाठी जात पंच, साक्षीदारांसमक्ष लाचेची मागणी केली.

त्यामुळे या तिघा संशयितांविरूध्द निजामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. नंदुरबारचे पोलिस उपअधीक्षक राकेश चौधरी, निरीक्षक समाधान वाघ, माधवी वाघ, पथकातील हवालदार विजय ठाकरे, ज्योती पाटील, मनोज अहिरे, देवराम गावित, संदीप नावाडेकर, अमोल मराठे आदींनी ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vasant More : ''शिवतीर्थ, मातोश्री लांब राहिलं आधी आमच्या अंगावर या''; वसंत मोरेंनी घेतला निशिकांत दुबेंचा समाचार...

Hindu Rashtra: भारत हिंदुराष्ट्र कधीपर्यंत होणार? डेडलाईन आली; शंकराचार्यांनी अगदी स्पष्ट शब्दात सांगून टाकलं

तुलसी २.० ची पहिली झलक- ‘क्यूँकी सास भी कभी बहू थी २’चा नॉस्टॅल्जिया पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!

Video : क्षणभराच्या रागात गेला जीव! निर्दयी माणसानं किरकोळ भांडणात तरुणाला धावत्या रेल्वेतून ढकललं; अंगावर काटा आणणारा VIDEO व्हायरल

Latest Maharashtra News Updates : पुण्यातील रामवाडीमध्ये पेट्रोल चोराने जाळल्या सहा मोटरसायकल

SCROLL FOR NEXT