उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime : पिस्तुलाचा धाक दाखवून तरुणाला लुटले; तिघांवर गुन्हा

सकाळ वृत्तसेवा

Dhule Crime : तिखी फाट्यावर पिस्तुलाचा धाक दाखवून मेडिकल व्यावसायिकाला लुटल्याचा प्रकार रविवारी (ता. १३) रात्री सव्वादहाच्या सुमारास घडला. (Crime against three for robbing man Dhule Crime)

दरम्यान, ९ ऑगस्टला धुळे शहरातील नगावबारी परिसरातील तरुणाच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून लुटल्याची घटना घडली होती. त्यानंतर पुन्हा अशी घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

प्रशांत सुरेश साळुंके (रा. प्लॉट नं. ३६ अ/३७ ब, आर्यनगर, वडेल रोड, वलवाडी शिवार, धुळे) या मेडिकल व्यावसायिकाने दिलेल्या फिर्यादीनुसार १३ ऑगस्टला रात्री सव्वादहाच्या सुमारास ते गरताड गावाच्या शिवारातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २११ वरील चाळीसगाव ते धुळे रोडवरील तिखी फाट्याजवळून त्यांच्या दुचाकी (एमएच ०६, एव्ही ७९९३)ने जात होते. त्या वेळी मागून येणाऱ्या दुचाकीवरील तिघांपैकी मागे बसलेल्या व्यक्तीने त्यांच्या उजव्या दंडावर धक्का मारत त्यांना पाडले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

जमिनीवर पडल्यावर त्याने त्याच्या हातातील पिस्तुलाचा धाक दाखवत आठ हजार रुपये रोकड, पाच हजार रुपये किमतीचा मोबाईल हिसकावला तसेच १५ हजार रुपये किमतीची दुचाकी घेऊन ते पसार झाले.

या फिर्यादीवरून मोहाडीनगर पोलिस ठाण्यात तिघा चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक एस. एस. काळे तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

Buddhist Religion: बौद्ध धर्माचा संवाद - साहित्य विस्तार

Chhatrapati Sambhajinagar News: कायगावात विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू; गंगापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

IND vs WI 2nd ODI : भारताचा रेकॉर्ड ब्रेकिंग विजय! शुभमन गिलची दोन वर्ल्ड रेकॉर्ड्सना गवसणी; रोहितची बॅट तळपली

IND vs WI 2nd ODI : शुभमन गिलने झळकावले इतिहासातील वेगवान द्विशतक! विक्रमांचा पाऊस अन् टीम इंडियाचा वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT