crime esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह तिघांवर गुन्हा

साक्री पंचायत समितीत माहिती अधिकारांतर्गत माहिती मागणाऱ्या एकास ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह तिघांनी बेदम मारहाण केली.

सकाळ वृत्तसेवा

Dhule Crime News : साक्री पंचायत समितीत माहिती अधिकारांतर्गत माहिती मागणाऱ्या एकास ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह तिघांनी बेदम मारहाण केली. त्याच्याकडील भ्रष्टाचाराचे कागदपत्रेही हिसकावून घेतली.

या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशाने तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.(Crime against village extension officer and three dhule crime news)

कावठे (ता. साक्री) येथील प्रवीण मुरलीधर बोरसे या शेतकऱ्याने बुरूडखे ग्रामपंचायतीतील कामांबाबत माहितीच्या अधिकारांतर्गत माहिती मागविलेली होती. त्याबाबत प्रथम अपिलीय अधिकारी तथा गटविकास अधिकारी यांच्याकडे सुनावणीसाठी तारीख दिलेली होती.

त्यानुसार फिर्यादी साक्री पंचायत समिती कार्यालयात गेले असता संबंधित गटविकास अधिकारी दालनात अनुपस्थित असल्याने फिर्यादी हे चौकशीसाठी सहाय्यक गटविकास अधिकारी यांच्या दालनात चर्चा करत होते.

त्या वेळी ग्रामविस्तार अधिकारी जे. पी. खाडे यांनी वाद घातला. शिवीगाळ करून कानशिलात मारली. लाथ मारून खुर्चीवरून खाली पाडले. तसेच दोन अज्ञात व्यक्तींना बोलावून तिघांनी हाताबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच माहिती अधिकारांतर्गत मिळविलेले भ्रष्टाचाराचे कागदपत्र व अहवाल हिसकावून घेतले. त्यानंतर साक्री पोलिसांत खोटी तक्रार दिली.

दरम्यान, पोलिसांनी माझी तक्रार घेतली नाही. त्यानंतर श्री. बोरसे यांनी न्यायालयात तक्रारी दिली. न्यायालयाने चौकशीअंती ग्रामविस्तार अधिकारी खाडे याच्यासह तिघांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार तिघांवर साक्री पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक रौंदळ तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT