crime against youth for abducting and marrying minor girl dhule crime news esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : अल्पवयीन मुलीस पळवून लग्न केल्याचा युवकावर गुन्हा

अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेत तिच्याशी विवाह केल्याच्या प्रकरणात युवकाविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

सकाळ वृत्तसेवा

Dhule Crime News : अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेत तिच्याशी विवाह केल्याच्या प्रकरणात युवकाविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

संशयित युवकाला अटक करण्यात आली असून, पीडित मुलीची निरीक्षणगृहात रवानगी करण्यात आली. (crime against youth for abducting and marrying minor girl dhule crime news)

मुलीच्या वडिलांनी याबाबत फिर्याद दिली. त्यांची मुलगी १२ डिसेंबरला सकाळी साडेनऊला कॉलेजला जात असल्याचे सांगून घरातून निघून गेली. ती उशिरापर्यंत न परतल्याने कुटुंबीयांनी नातलगांकडे व परिसरात शोध घेतला. मात्र ती आढळली नाही. शहर पोलिस ठाण्यात मुलीच्या पालकांनी माहिती दिल्याने बेपत्ता नोंद करण्यात आली.

दरम्यान, बुधवारी (ता. ९) शहर पोलिस ठाण्यात पोलिसांनी मुलीच्या वडिलांना बोलावून माहिती दिल्यानंतर तिने गौरव तथा शुभम नितीन पाटील (वय २३, रा. विखरण, ता. शिरपूर) याच्याशी लग्न केल्याची माहिती मिळाली.

मुलीच्या वडिलांनी मुलीचा जन्मदाखला पोलिसांसमोर सादर केल्यानंतर तिचे वय १८ वर्षांपेक्षा कमी असल्याचे निष्पन्न झाले.

त्यामुळे अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेत तिच्याशी लग्न केल्याच्या संशयावरून संशयित गौरव तथा शुभम नितीन पाटील याच्याविरोधात शहर पोलिस ठाण्यात बाललैंगिक अत्याचार व बालविवाह प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. रात्री आठला संशयिताला अटक करण्यात आली. पीडितेला धुळे येथील निरीक्षणगृहात रवाना करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लावणीची लय, अभिनयाची जादू अन् अजरामर भूमिका; मधू कांबीकर यांची एक्झिट, मराठी कलाविश्वावर शोककळा

VIRAT KOHLI : विराट कोहलीच्या टेस्ट निवृत्तीला अजित आगरकर जबाबदार? ‘ज्या पद्धतीने त्याच्याशी वागलं...’ माजी क्रिकेटपटूचं मोठं वक्तव्य

Kolhapur Ambabai Temple : नवरात्रोत्सवाच्या धामधुमीत कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात नवा वाद; देवस्थान समितीविरोधात पुजारी आक्रमक; नेमका वाद काय?

SA vs AUS 1st Test: व्हॉट अ कॅच...! स्टीव्ह स्मिथची चतुराई अन् आफ्रिकन फलंदाजचा करेक्ट कार्यक्रम; ऑसी खेळाडूचा विश्वविक्रम Video

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर कारखाना निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचे खाते उघडले; संग्राम सोरटे विजयी

SCROLL FOR NEXT