उत्तर महाराष्ट्र

शर्टवर भस्म टाकताच शेतकऱ्याला भुरळ आली; क्षणात डिक्‍कीतून कर्जाचे पैसे लंपास   

कमलेश पटेल

शहादा : शहरातील भाजी मार्केट परिसरातील युनियन बँकेच्या शाखेत शेतकरी कृषी कर्जाचे पैसे काढण्यासाठी गेले. पैसे काढून दुचाकीच्या डिक्कीत कृषी कर्जाची रक्कम ठेवताच एका व्यक्तीने शर्टवर राखसारखे भस्म टाकले. क्षणात शेतकऱ्यास भुरळ येताच चोरट्याने डिक्कीतून कर्जाची रक्कम डिक्कीतून लांबविल्याची घटना घडली. 

कळमसर मोहिदा (ता. तळोदा) येथील रतिलाल पाटील या शेतकऱ्यास कृषी कर्ज मंजूर झालेले होते. शहादा येथील भाजीपाला मार्केटमधील युनियन बँकेत जमा झालेली ही रक्कम काढण्यासाठी पाटील हे नारायण पाटील यांच्यासह (एमएच ३९, आर ७५७४) या दुचाकीने शहादा येथे आल्यानंतर बँकेतील खात्यातून रक्कम काढून ती दुचाकीच्या डिक्कीत ठेवून उभे होते. त्यांच्यासोबतचे नारायण पाटील हे मोबाईल दुरुस्तीसाठी बँकेपासून काही अंतरावरील मोबाईल शॉपवर गेले.

मागून आला आणि...

यावेळी रतिलाल पाटील यांच्या मागून एक व्यक्ती आला आणि रतिलाल पाटील यांच्या शर्टवर राखेसारखे भस्म टाकले. आणि रतिलाल यांना क्षणात भुरळ आली, काही समजण्याच्या आत चोरट्याने डिकीतून संपूर्ण रक्कम चोरून पोबारा केला.

पोलिसात धाव 

काही मिनिटांनी मोबाईल दुरुस्त करून नारायण पाटील परत आले असता त्यांनी रतिलाल पाटील हे गोंधळल्याचे पाहून शर्टवर काय पडले हे विचारले. त्यांच्या लक्षात आले नाही त्यांनी डिक्की उघडून पाहिले असता त्यातील रक्कम चोरीस गेल्याचे लक्षात आले. त्यांनी तत्काळ पोलिसांत धाव घेत या घटनेची माहिती दिली.  
 

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Drought: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळी मदतीला दोन हेक्टरची मर्यादा, तीन हेक्टरचे पंचनामे, राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर

स्मार्ट सल्ला : इच्छापत्राची समंजस अंमलबजावणी

अर्थबोध : शेअर बाजाराची ऐतिहासिक घसरण काय सांगते?

Pune MPSC Protest: आंदोलनाच्या चौथ्या दिवशीही आंदोलनाची धग कायम; आंदोलनाच्या चौथ्या दिवशीही नेत्यांची रीघ, परीक्षा पद्धतीवरून विद्यार्थ्यांमध्ये मतभेद

Maharashtra Weather : मॉन्सून अर्ध्या महाराष्ट्रातून माघारी; ‘ऑक्टोबर हीट’चा तडाखा वाढला, मुंबईसह ५ जिल्ह्यांना येलो अलर्ट

SCROLL FOR NEXT