Cyber-Crimer 
उत्तर महाराष्ट्र

गुन्हेगारांच्या रडारवर मेट्रोसिटी

नरेश हाळणोर

नाशिक - सायबर गुन्हेगारांच्या रडारवर राज्यातील मुंबई, पुण्यासह नागपूर या मेट्रोसिटी आहेत. स्मार्टफोनच्या माध्यमातून इंटरनेटचा वापर वाढल्याने अन्‌ त्याचा निष्काळजीपणे वापर करणाऱ्यांवर पाळत ठेवणे सायबर गुन्हेगारांना सोपे झाले. बॅंकांसह कंपन्यांचा डेटा हॅक करून त्याची डार्कबेसलिंक डेटा क्षेत्रात खरेदी-विक्री करणाऱ्यांस लगाम घालण्यासाठी "सर्ट महाराष्ट्र' (कॉम्प्युटर इमरजन्सी रिस्पॉन्स टीम) विभागाची निर्मिती करण्यात आली असून, या माध्यमातून लवकरच डेटा चोरीला आळा घातला जाणे शक्‍य होणार आहे.

सायबर गुन्हेगारीमध्ये 98 टक्के गुन्हेगार हे भारतीय असून, ते बॅंकांच्या नावाने, नोकरी वा लग्नाचे आमिष वा दामदुपटीचे आमिष दाखवून ऑनलाइन फसवणूक करतात. तर, 2 टक्के गुन्ह्यांत परदेशी गुन्हेगार आहेत. यात कंपन्यांचा डेटा हॅक करणे वा बिटक्वाइनच्या माध्यमातून फसवणूक करणे. विशेषतः यात नायजेरियन गुन्हेगारांचे मोठे जाळे असल्याचे तपासातून समोर आले आहे.

"सर्ट महाराष्ट्र' सेलची निर्मिती
"सर्ट महाराष्ट्र' विभागाने पायरसीशी संबंधित 10 संकेतस्थळे बंद केली. तर, डाटाबेसलिंकमध्ये शिरकाव करून येत्या काळात "सर्ट महाराष्ट्र'च्या माध्यमातून ऑनलाइन फसवणुकीवर आळा घालणे शक्‍य होणार आहे.

नाशिक सायबर विभाग सर्वोत्तम
सायबर गुन्हेगारीत राज्यात मुंबई आघाडीवर, तर त्याखालोखाल पुणे शहर- ग्रामीण, नागपूर शहर- ग्रामीणचा समावेश आहे. तर, राज्यातील सर्वोत्तम सायबर लॅब ही नाशिक पोलिस आयुक्तालयाच्या सायबर पोलिस ठाण्याची आहे. नाशिक सायबर पोलिसात एकही गुन्हा प्रलंबित नाही, हेच सर्वोत्तम कामगिरीचे प्रमाण आहे.

सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी जनजागृती हाच सर्वोत्तम पर्याय आहे. मोबाईल वापरकर्त्यांनी काळजी घेतली तर फसवणूक होऊच शकत नाही. त्यासाठी राज्यभर पोलिसांच्या माध्यमातून जनजागृती सुरू आहे.
- बालसिंग राजपूत, पोलिस अधीक्षक, राज्य सायबर सिक्‍युरिटी विभाग, मुंबई

दृष्टिक्षेपात...
भारताची लोकसंख्या : 1 कोटी 25 लाख
मोबाईल वापरकर्ते : लोकसंख्येच्या 70 टक्के
राज्यात ऑनलाइन फसवणूक : 2400 कोटी रुपये (2016-17)
सायबर इकॉनॉमिक्‍स गुन्हे : 60 टक्के
महिला/मुलांचे शोषण : 30 टक्के
भारतीय सायबर गुन्हेगार - 98 टक्के
परदेशी सायबर गुन्हेगार - 2 टक्‍के

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रॉपर्टीची दस्त नोंदणी १५ दिवसांत! तक्रार आल्यास मंडलाधिकाऱ्यांना निकालासाठी तीन महिन्याची मुदत; तक्रारदारास प्रांताधिकाऱ्यांकडे अपिलाचाही अधिकार

आजचे राशिभविष्य - 02 एप्रिल 2026

Ragi Masala Chilla Wrap : झटपट तयार होणारा, पौष्टिक अन् चविष्ट 'रागी मसाला चिला रॅप'; दिवसाची सुरुवात करा एनर्जेटिक नाश्त्याने! लगेच लिहून घ्या सोपी रेसिपी

Panchang : 2 एप्रिल पंचांग विशेष! हनुमान जयंती, पौर्णिमा आणि शुभ मुहूर्त जाणून घ्या

खासगी इंग्रजी शाळांमध्ये मोफत प्रवेश! एप्रिलमध्येच ‘आरटीई’ची लॉटरी; सोलापूर जिल्ह्यात २७८२ जागांसाठी ६ हजार ७०९ विद्यार्थ्यांचे अर्ज, वाचा...

SCROLL FOR NEXT