crime esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Crime News : कुख्यात गुन्हेगार वर्षभरासाठी नंदुरबार जिल्ह्यातून हद्दपार

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar Crime News : आगामी सण/उत्सवाच्या अनुषंगाने जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेसाठी बाधा ठरणारे तसेच मालमत्ता व शरीराविरुद्धचे गुन्हे करणाऱ्या व्यक्तींची माहिती घेऊन त्यांच्यावर दाखल गुन्ह्यांचा आढावा घेतला असता अक्कलकुवा पोलिस ठाणे हद्दीतील मोहसीन रफीक मक्राणी (रा.मक्राणीफळी, अक्कलकुवा) यास एक वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश पोलिस प्रशासनाने दिले. (criminals exiled from Nandurbar district for year nandurbar crime news)

जिल्हा पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत मोहसीन रफीक मक्राणी दहशत व वचक ठेवण्यासाठी नियमितपणे गुन्हे करत असल्याचे निदर्शनास आले.

त्याच्यापासून सामान्य नागरिकांच्या मालमत्तेस व जीवीवितास धोका निर्माण झालेला असून, त्याच्यावर वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई करूनदेखील त्याच्या वर्तनात सुधारणा झालेली नाही, म्हणून पोलिस अधीक्षकांनी मक्राणीवर कठोर प्रतिबंधक कारवाईसाठी अक्कलकुवा पोलिस ठाण्याचे निरीक्षक दीपक बुधवंत यांना आदेशित केले होते.

त्याला दोन वर्षे कालावधीसाठी नंदुरबार जिल्ह्यातून हद्दपार करण्याचा प्रस्ताव तळोदा उपविभागीय दंडाधिकारीमंदार पत्की यांच्या कार्यालयात पाठविण्यात आला होता.

त्यानुसार यास एक वर्ष कालावधीसाठी हद्दपार करण्याचे आदेश मंगळवारी (ता. ७) दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT