cuting tought of yonger in mamurabad jalgaon 
उत्तर महाराष्ट्र

ग्रा.प.निधीचे काय झाले, विचारणाऱ्याची...कापली जीभ

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : ममुराबाद ग्रामपंचायतीला अनुसूचित जातीसाठी किती निधी आला, त्याचे काय झाले, याची विचारणा केल्याचा राग येऊन संशयितांनी मागील भांडण उकरून काढत. चंद्रकांत विजय बोरसे (रा. इंदिरानगर ममुराबाद) याला जातिवाचक शिवीगाळ करून बेदम मारहाण केली. या मारहाणीत चंद्रकांत बोरसे याची जीभ कापली गेली असून त्याची आई, बहीण व काका अशांनाही मारहाण झाल्याची घटना 2 डिसेंबरला घडली होती. जखमीच्या उपचारानंतर पोलिसांनी जाब-जबाब घेतल्यावर 12 संशयितांविरुद्ध ऍट्रॉसिटी अंतर्गत गुन्ह्याची नोंद केली आहे. 

ममुराबाद येथील कुंभारवाड्यात चंद्रकांत बोरसे हे पत्नी मीनाबाई, वडील श्रीधर बोरसे, आई कस्तुराबाई यांच्यासह राहतात. सरपंच भारती गोपाळ मोरे या समाजातीलच असल्याने समाजासाठी नेमका किती निधी आला याची विचारणा काही सदस्यांना चंद्रकांत बोरसे याने केली. आता आमच्या समाजाच्या सरपंच झाल्या आहेत, त्याचा गावाला फायदाच होणार असल्याचे चंद्रकांत गावात सांगत होता. त्याचा राग येऊन 4 नोव्हेंबरला सकाळी दहाला बसस्थानकाजवळ संशयित भरत हिवरकर याने थांबवून कायरे..काय? म्हणत होता तू..तुमच्या समाजाचा सरपंच झाला म्हणून तुम्ही जास्त मातले आहे. असे म्हणत जातिवाचक शिवीगाळ केली. मात्र, त्यावेळेस गावचा विषय असल्याने इतर ग्रामस्थांनी वाद सोडवून समजूत घातली. मात्र, तेव्हापासूनच संशयिताचा चंद्रकांत बोरसे याच्यावर डाव होता. 

आई, काकासह बहिणीला मारहाण 
2 डिसेंबरला रात्री नऊला चंद्रकांत बोरसे कुंभारवाड्यात गेला होता. येथे पूर्वीपासूनच रागात असलेल्या भरत हिवरकर याने काय रे...इकडे ये, असे म्हणत जातिवाचक शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरवात केली. तेव्हा बुधा हिवरकर याच्यासह इतरांनीही लाठ्या काठ्यांनी मारहाण करण्यास सुरवात केली. तेव्हा चंद्रकांतची आई, बहीण तसेच काका हे भांडण सोडविण्यास आले असता, त्यांनाही जातिवाचक शिवीगाळ करून मारहाण केली. या मारहाणीत चंद्रकांतची जीभ कापल्या गेली. उपचारानंतर चंद्रकांत बोरसे याचा पोलिसांनी जाबजबाब घेतला. त्यावरून, भरत हिवरकर, बुधा हिवरकर, पृथ्वीराज पाटील, भिका पाटील, आबा दूधवाला. संजय कुंभार, कडू कुंभार, श्‍याम बारकू कुंभार, प्रमोद कुंभार, दत्तू कुंभार, बुधा कुंभार या 12 जणांविरोधात ऍट्रासीटीअंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली. तपास पोलिस उपअधीक्षक डॉ. निलाभ रोहन करीत आहेत. 
 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Nashik Highway Accident : पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात; भरधाव पिकअपची धडक, सहा मेंढ्या ठार

FDA Action: एफडीएच्या कारवाईचा धसका! सीसीआयच्या उपाहारगृहाचा परवाना निलंबित; मुंबईतील इतर क्लबसह जिमखाना प्रशासने सतर्क

Latest Marathi News Live Update : बारवी धरण ९१ टक्के भरलं; दरवाजे कधीही उघडण्याची शक्यता, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

ब्लॉकबस्टर 'तुंबाडची मंजुळा' आता घरबसल्या पाहता येणार! कुठे आणि कधी पाहाल?

Crime News: टीव्ही पाहताना चुकून चॅनेल बदललं; पत्नीला संताप अनावर, विळा उचलला अन्... पतीसोबत धक्कादायक कृत्य घडलं

SCROLL FOR NEXT