Cvigil-App
Cvigil-App 
उत्तर महाराष्ट्र

आचारसंहिता भंगाविरोधात "ऍप'चे हत्यार

सकाळवृत्तसेवा

नाशिक - लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या असून, आचारसंहिता लागू झाली आहे. या वेळच्या आचारसंहितेचे वैशिष्ट्य म्हणजे यंदापासून प्रथमच सामान्य मतदारांना सिटिझन व्हिजिलन्स अंतर्गत "सी-व्हिजिल' हे जीपीएस प्रणालीयुक्त मोबाईल ऍप्लिकेशन तक्रारीसाठी उपलब्ध होणार आहे.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीला ऑनलाइन स्मार्ट ऍप्लिकेशनचा आधार असणार आहे. निवडणूक आयोगाने नागरिकांना सी-व्हिजिल (Cvigil) हे मोबाईल ऍप्लिकेशन उपलब्ध करून दिले आहे. हे ऍप निवडणूक आयोगाकडून सामान्यांना डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध होणार आहे. प्रत्येक मतदारसंघात त्याविषयी त्या-त्या ठिकाणच्या निवडणूक यंत्रणेला प्रबोधन करावे लागणार आहे.

100 मिनिटांत कारवाई
"सी-व्हिजिल'अंतर्गत कोणालाही त्याच्या भागातील निवडणुकीतील गैरप्रकाराबाबत तक्रारीची सोय उपलब्ध होणार आहे. निवडणुकीच्या फलकांमुळे विद्रुपीकरण होत असल्यास किंवा कुठे गैरप्रकार सुरू असल्याचे लक्षात येताच, कुणीही तक्रारदार थेट त्याच्या मोबाईलवरून संबधित सी-व्हिजिल ऍपद्वारे थेट निवडणूक आयोगापर्यत तक्रार मांडू शकणार आहे. तक्रार आल्यानंतर अवघ्या वीस मिनिटांत निवडणूक विभागाच्या भरारी पथकांनी जीपीएस लोकेशनच्या आधारे घटनास्थळी भेट द्यायची आहे. त्यानंतर पुढील 100 मिनिटांत आचारसंहिता भंगप्रकरणी कारवाई अपेक्षित आहे. नागरिकांच्या तक्रारीची दखल घेण्यासाठी निवडणूक विभागाला भरारी पथक नेमावी लागणार आहे.

वीस मिनिटांत तक्रारीची दखल घेत पुढील अर्ध्या तासात तक्रारीची माहिती देऊन त्यावरील कारवाईविषयी भरारी पथकाला निवडणूक यंत्रणेला कळवावे लागेल. त्यानंतर 100 मिनिटांत थेट कारवाई करून तसा अहवाल द्यावा लागणार आहे. मात्र, जबाबदारी नेमून दिलेल्या भरारी पथकाने समजा अशी कारवाईच केली नाही. तर, निवडणूक विभागाकडून संबंधितांवर उलटी कारवाई करण्याची तरतूद आहे. त्यामुळेच वेळेचे आणि कारवाईचे बंधन असलेली ही ऑनलाइन प्रणाली हे जनतेकडील प्रमुख हत्यार असेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yamini Jadhav: यामिनी जाधव यांना शिवसेनेकडून दक्षिण मुंबईमधून उमेदवारी

Amit Shah Fake Video Case : अमित शाह फेक व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई, दोघांना अटक; आप अन् काँग्रेसशी लिंक?

Mumbai Indians: 'मुंबई संघात फूट पडलीये म्हणूनच...', ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड कप विजेता कर्णधार स्पष्टच बोलला

The Great Indian Kapil Show: अन् दोन्ही भावांच्या डोळ्यात पाणी आलं; 'या' कारणामुळे कपिल शर्मा शोमध्ये सनी आणि बॉबी देओल झाले भावूक

Nashik Fraud Crime : आर्किटेक्टला साडेपाच लाखांना घातला गंडा! संशयित युवतीविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT