A woman wails during a monkey's funeral procession. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : ‘...गावले शांतता लाभू दे म्हणा दादा!’ दलवाडे येथे माकडाचा दशक्रिया विधी

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : ईडा पीडा जावू दे, गावले शांतता लागू दे म्हणा दादा ! ..... आणि माकडांची निघाली अंत्ययात्रा ! ( दलवाडे (प्र. सोनगीर, ता. शिंदखेडा) येथे महिलांनी ‘ईडा पीडा टळू दे, आम्हना गावले शांतता लाभू दे म्हणा दादा’ असा आक्रोश करीत माकडाची अंत्ययात्रा काढण्यात आली. (Dashakriya Ritual of Monkey at Talwade in dhule news )

खानदेशात वयस्कर गृहस्थांची अंत्ययात्रा शाही थाटात निघत असते. सजविलेली डोली (तिरडी), बँड, गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजीही असतेच. अगदी तशीच अंत्ययात्रा दलवाडे येथे बुधवारी माकडांची निघाली. अंत्ययात्रेला अख्खा गाव लोटला होता.

येथील विठ्ठल सोबा नगराळे यांच्या शेतात माकड मृतावस्थेत आढळून आले होते. बातमी संपूर्ण गावाला समजली. मृतदेह गावात आणण्यात अला. पारंपरिक पद्धतीने अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला.

सायंकाळी सहाच्या सुमारास अंत्ययात्रा काढण्यात आली. आबालवृद्धांसह अख्खा गावच अंत्ययात्रेला लोटला होता. चार खांदेकऱ्यांसह सगळ्यांनीच डोली वजा तिरडीला खांदा दिला. दिवटी धरणाऱ्याने पाणीही दिले.

रविवारी (ता. ५) दशक्रिया विधी करण्यात येणार आहे. स्मशानभूमीत श्रद्धांजलीपर भाषणेही झाली. या वेळी पाच दिवसांचा सार्वजनिक दुखवटा घोषित करण्यात आला. दुखवटा निवारण्यासाठी दलवाडेसह चिमठाणे व पिंप्री गावजेवणही देण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar Assembly Election 2025: बिहार निवडणुकीच्या तारखांची घोषणा करत, ‘ECI’ने मतदारांनाही केल्या १० महत्त्वाच्या सूचना!

IND vs PAK : भारताच्या 'पोरींना' दिला त्रास, ICC ने उतरवला माज! पाकिस्तानच्या खेळाडूवर कारवाई

Maharashtra Politics: गणेश नाईकांचं 'ते' विधान अन् 14 गावांचा एकनाथ शिंदे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय

Uttar Pradesh :  कर विभागात फील्डवर ‘अशा’ अधिकाऱ्यांचीच करा भरती; CM योगी आदित्यनाथ यांनी दिले कडक आदेश

Uttrakhand : उत्तराखंडची ही ठिकाणं पहाल तर स्वित्झर्लंड विसरून जाल; हे पाच सुंदर लोकेशन्स एकदा पहायलाच हवेत

SCROLL FOR NEXT