Dhule Marathon News
Dhule Marathon News esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Marathon Update : नोंदणीस मंगळवारपर्यंतच मुदत; शहर, जिल्ह्यातील केंद्रांवर संपर्क साधावा

सकाळ वृत्तसेवा

धुळे : शहरात प्रथमच होणाऱ्या जिल्हास्तरीय महामॅरेथॉन स्पर्धेसाठी मंगळवार (ता. ३१)पर्यंत मोफत नोंदणीची मुदत असेल. स्पर्धकांना वेबसाइट, सोशल मीडियावरील गुगल फॉर्म, वेबसाइटवरील मोफत नोंदणीचा क्यूआर कोड आणि शहरासह जिल्ह्यात जाहीर केलेल्या केंद्रांवर, विहित नमुन्यातील छापील अर्जाद्वारे नोंदणी करता येईल.

आठवी व त्यापासून पुढील सर्व वयोगटातील स्पर्धकांना नोंदणीचे आवाहन आयोजकांनी केले आहे. या स्पर्धेत देशासह राज्यातूनही स्पर्धकांना सहभागाची संधी देण्यात आली आहे. (Deadline for registration is Tuesday Maha Marathon competition City district center should be contacted Dhule News)

जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, जिल्हा परिषदेच्या सीईओ बुवनेश्‍वरी एस., महापालिका आयुक्त देवीदास टेकाळे, तसेच अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, सहाय्यक पोलिस अधीक्षक हृषीकेश रेड्डी यांनी धुळे शहर व जिल्ह्यातील आठवीपासून आणि त्यापुढील सर्व वयोगटांतील स्पर्धकांना अधिकाधिक संख्येने नोंदणीसह सहभागाचे आवाहन केले आहे.

पोलिस प्रशासनाच्या सायबर टीमच्या सहकार्याने बोस्टन कॉम्प्युटरर्सचे विष्णू फाफट व टीमने अल्पावधीत तयार केलेल्या www.dhulemarathon.in या वेबसाइटवर, तसेच त्यावरील क्यूआर कोडने मोफत नोंदणी करता येईल.

हेही वाचा : ....इथं बनतो आपला लाडका तिरंगा

नोंदणीची केंद्रे अशी

स्पर्धकाची ऑनलाइन किंवा विहित अर्जापैकी एकच नोंदणी ग्राह्य धरली जाईल. तसेच ३१ जानेवारीला सायंकाळी सहाला नोंदणी प्रक्रिया बंद होईल. स्पर्धेसाठी ऑनलाइन नोंदणीचे स्पर्धक वगळून इतर स्पर्धक, नागरिकांनी ‘सकाळ’चे धुळे विभागीय कार्यालय (बर्वे कॉम्प्लेक्स, जिजामाता हायस्कूलसमोर), तसेच धुळे शहरातील देवपूरमधील कांकरिया मेडिकल (दत्तमंदिर चौक), जळगाव जनता बँक शाखा, अजमेरा फॉर्मसी कॉलेज कार्यालय (उदय गुजर, नेहरू चौक), गांधी पुतळ्याजवळ आग्रा रोडवर बंग एजन्सी, ठाकूर ॲन्ड सन्स, बडगुजर सायकल मार्ट, अलंकार ब्यूटी शॉप (खोल गल्ली), सराफ बाजारात दिव्य ज्वेलर्स, सुनील मेडिकल (८० फुटी रोड), भारत मशिनरी (मुंदडा मार्केट), लक्ष्मी टेडर्स (कनोसा हायस्कूलसमोर), द जिम (अग्रवालनगरजवळ), सारजा मेडिकल (जयहिंद चौक, मॉडर्न नर्सरीसमोर), सायकल दुकान (पराग पाटील, जयहिंद सीनिअर कॉलेजसमोर), दत्त कृपा फोटो स्टुडिओ (पाचकंदील, शिरपूर), माय होम (शिरपूर), अश्विनी सुपर शॉप (दोंडाईचा), डॉ. सुजय पवार (शिंदखेडा), टी स्टॉल प्रमोद गांगुर्डे (पिंपळनेर), कानुश्री इलेक्ट्रॉनिक्स (मेन रोड, निजामपूर), पंकज जयस्वाल (लामकनी), रेवती लेडीज शॉप (दोंडाईचा), साक्री क्रीडासंकुल (अनिल पाटील, साक्री), शांतीकेसर सुपर मार्केट (साक्री) येथे मोफत विहित नमुन्यातील अर्ज भरावेत व आधारकार्ड किंवा एका ओळखपत्राची छायांकित प्रत जोडावी. दरम्यान, नागरिकांनी नोंदणीसाठी पोलिस ठाण्यांशीही संपर्क साधावा.

स्पर्धेत धावा किंवा चाला...

मॅरेथॉन स्पर्धेसाठी काही कुटुंबांसह प्रौढ, वृद्धांनी सहभागाची अपेक्षा व्यक्त केली आहे. त्यांनी स्पर्धेत धावले तर उत्तम, अन्यथा, ते चालू शकतात आणि स्पर्धेत सहभागाचा आनंद घेऊ शकतात. त्यांनाही सहभागाचे आवाहन पोलिस अधीक्षक बारकुंड यांनी केले आहे. स्पर्धेसाठी नियोजित मार्गावर एनर्जी ड्रिंक, पाणी, वैद्यकीय पथके, फिजिओथेअरपिस्ट, रुग्णवाहिका तैनात असतील, असेही त्यांनी सांगितले..

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH Live Score: हार्दिकने जिंकला टॉस! मुंबईकडून 'या' खेळाडूचे पदार्पण, तर हैदराबाद संघातही मोठा बदल; पाहा प्लेइंग-11

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

Disha Patani : दिशाच्या बिकिनी लुकचा सोशल मीडियावर धुमाकूळ; फोटो पाहून नेटकरी म्हणाले...

Gautam Gambhir: 'KKR जिंकल्यावर गंभीरचे कौतुक अन् हरल्यावर श्रेयसची चूक?' दिग्गज क्रिकेटरच्या पोस्टने उडवली खळबळ

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT