vaghera farmer.png 
उत्तर महाराष्ट्र

VIDEO : सत्तास्थापनेत व्यस्त नेत्यांनो...इथं रोजच सरण रचण्याची वेळ आलीय

राम खुर्दळ : सकाळ वृत्तसेवा

नाशिक :  वाघेरा परिसरात अवकाळी पावसाने आज दिवसभर पावसाने हैदोस घातला असून सोंगणीला आलेल्या भाताच्या पिक डोळ्यासमोर पावसात उध्वस्त झाले. ऐन तोंडी आलेला घास हिसकवलयागत शेतीचे वाटटोळे झाल्याने अन्नधान्यच पाण्यात भिजल्याने ऐन महागाईत घरदाराचा खर्च कसा भागवायचा? मुलाबाळांच्या शिक्षणाचा खर्च कुठून आणायचा?या अवकाळीने आमचे जगणेच मुश्किल केले,लोकांचे देणेघेणे कसे फेडायचे? हाच कसोटीचा प्रश्न आम्हाला छळतोय,मागील आठवड्यात आमदार खासदारांचे दौरे झाले,पंचनामे झाले,मात्र पिकांच्या नुकसानीचे कुठलीही मदत आमच्या हाती येईल याचा आम्हाला विश्वास राहिला नसल्याने आम्ही प्रचंड चिंताग्रस्त आहोत असा सवाल,उद्विग्नय प्रतिक्रिया वाघेरा येथील नुकसानग्रस्त भात उत्पादक तरुण शेतकरी विष्णू माळेकर यांनी दैनिक सकाळच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली.

"आम्हालाच आमचे सरण रचण्याची वेळ​
 मागील महिन्यातील अवकाळी पावसाने आमचे शेत झोडपले,त्यात भाताचे,शेतातील टोम्याटोचे मोठे नुकसान झाले,त्यातून सावरण्याचा आटापिटा सुरू असताना (ता.८) रोजी पुन्हा अवकाळी पावसाने सतत धार लावली, त्यामुळे सोंगणीला आलेले उभे भात शेतातच पाण्यात भिजत आडवे झाले. भाताच्या वाळलेल्या कणीसाला पुन्हा यामुळं फुटवा येईल,,"आम्हालाच आमचे सरण रचण्याची वेळ येऊन ठेपल्याचे येथील शेतकऱ्यांनी सांगितले.अवकाळीने भाताचे मोठे नुकसान केल्याचे वाघेरा भागातील शेतकऱ्यांनी प्रतिक्रिया दिली, त्यांनी सकाळ शी बोलताना शासनाकडून मदतीची शास्वती नसल्याचे सांगितले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जरांगेंनी तिसऱ्यांदा मागितली परवानगी, फक्त ५० जण, वेळ पाळणार आणि शांततेत आंदोलन; मुंबई पोलिसांना दिलं हमीपत्र

Maratha Reservation: मनोज जरांगेंच्या सुरक्षेत वाढ; अंतरवाली सराटी ते मुंबई प्रवासात विशेष सुरक्षा पथक तैनात

Latest Marathi News Update : कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही...: राज ठाकरेंच्या टीकेचा रोष कोणाकडे

Rishi Panchami 2026: ऋषिपंचमीला नांगर न लागलेल्या रानभाज्यांचा नैवेद्य का दाखवला जातो? जाणून घ्या धार्मिक अन् वैज्ञानिक कारण!

Police Officer Death: अचानक प्रकृती बिघडली अन् रक्ताची उलटी झाली; २५ वर्षीय महिला पोलिसाची मृत्यूशी झुंज अपयशी

SCROLL FOR NEXT