Former Sarpanch of Kotinagar Magan Singh Vasave, Goma Vasave, Rajendra Vasave, Nilesh Vasave, Kisan Vasave and villagers while giving a statement to the Hasildars. esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar: साहेब, आमची दऱ्याखोऱ्यांतील पायपीट थांबवा हो! नवीन महसूली गाव कोटीनगर स्वतंत्र रेशन दुकानाची मागणी

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar : वर्षानुवर्षे विविध समस्यांचा सामना करणाऱ्या कोटीनगर (ता. अक्कलकुवा) या गावाला नुकताच स्वतंत्र महसुली गावाचा दर्जा मिळाला; परंतु तेथील नागरिकांना स्वस्त धान्यासाठी दऱ्याखोऱ्यांतून करावी लागणारी पायपीट मात्र थांबली नाही.

अवघड पायवाटांवर पडणारी ही पावले थांबविण्यासाठी कोटीनगरला स्वतंत्र स्वस्त धान्य दुकान मंजूर करण्यात यावे, अशी मागणी तहसीलदारांना निवेदन देत तेथील नागरिकांनी केली आहे. (Demand for new revenue village Kotinagar independent ration shop nandurbar news)

अतिदुर्गम भागातील कोटीनगर हे मोगरा गटग्रामपंचायतींतर्गत येणारे गाव असून, स्वस्त धान्यासाठी ११० कुटुंबांना शिधापत्रिकाही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या शिधापत्रिकाधारकांना ओघाणी येथील स्वस्त धान्य दुकानाशी जोडले असून, ते त्यांच्यासाठी गैरसोयीचे आहे.

हक्काच्या धान्यासाठी कोटीनगरवासीयांना दऱ्याखोऱ्यांतील अवघड अशा पायवाटेने जावे लागत असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. शिवाय पावसाळ्यात बहुतांश शिधापत्रिकाधारकांना स्वस्त धान्यापासून वंचित राहावे लागते.

ही समस्या सोडविण्यासाठी ओघाणी येथील स्वस्त धान्य दुकानाचे विभाजन करीत कोटीनगरला स्वतंत्र स्वस्त धान्य दुकान द्यावे.वाढते कुटुंब व लोकसंख्येच्या आधारे कोटीनगर गावाला स्वतंत्र महसुली गावाचा दर्जा मिळाला आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

तसे वाढती लोकसंख्या व शिधापत्रिकाधारकांची संख्या लक्षात घेत महसूल विभागामार्फत या गावाला स्वतंत्र स्वस्त धान्य दुकान मंजूर करावे, अशी अपेक्षा तेथील नागरिकांनी निवेदनाद्वारे व्यक्त केली आहे.

निवेदनावर माजी सरपंच मगनसिंग वसावे, गोमा वसावे, राजेंद्र वसावे, नीलेश वसावे, किसन वसावे व अन्य ग्रामस्थांच्या सह्या आहेत.

"कोटीनगरवासीयांना स्वस्त धान्यासाठी दऱ्याखोऱ्यांतील पायवाटेने ओघाणी गाठावे लागते. दरम्यान, जंगली श्वापदे व पाय घसरून अनर्थ घडण्याचा धोका अधिक संभवतो. अशा संभाव्य धोक्यातून सुटका करण्यासाठी स्वतंत्र महसुली गाव म्हणून घोषित केले गेले, तसे स्वतंत्र रेशन दुकान मंजूर करावे."-मगनसिंग वसावे, माजी सरपंच, ओघाणी-मोगरा, ता. अक्कलकुवा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICAI CA Final Result 2025 : आयसीएआय सीएचा परीक्षेचा निकाल जाहीर, जाणून घ्या कुठे आणि कसा पाहू शकता?

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : नारायण गडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील व महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न

ठरलं! 'चला हवा येऊ द्या' या दिवशी सुरु होणार... विनोदाच्या गँगवारमधून यंदा भाऊ कदम गायब?

जगातील सर्वात महाग अश्रू! उंटाच्या अश्रूच्या एक थेंबात 26 सापांचे विष नष्ट करण्याची ताकद, संशोधनातून माहिती समोर...

Ashadhi Ekadashi 2025 : देवशयनी आषाढी एकादशी; विठ्ठल भक्तीचा महापर्व, एकात्मता भक्ती व समर्पणाचे प्रतीक

SCROLL FOR NEXT