While expressing gratitude to Deputy Chief Minister Ajit Pawar, NCP District President Dr. Abhijit More. esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar News : 12 वर्षे रखडलेल्या उदय नदीवरील अपूर्ण पुलाचा प्रश्‍न अखेर सुटला; अजित पवार यांनी दिले 45 कोटी

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar News : धडगाव तालुक्यातील बिलगाव आणि सावऱ्या दिगर गावांना जोडणारा उदय नदीवरील पूल मागील बारा वर्षांपासून अपूर्णावस्थेत रखडला होता. त्याचे काम मार्गी लागावे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजित मोरे व युवक जिल्हाध्यक्ष सीताराम पावरा यांनी वेळोवेळी प्रयत्न केले.

त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ४५ कोटींचा निधी देऊन रखडेला पुलाच्या कामाचा प्रश्‍न मार्गी लावला आहे. डॉ. मोरे व श्री. पावरा यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन त्यांचे आभार व्यक्त केले आहेत. (Deputy Chief Minister Ajit Pawar providing funds of 45 crores for bridge nandurbar news)

आदिवासी समाजबांधवांसाठी दळणवळणाकरिता महत्त्वाचा असलेला धडगाव तालुक्यातील बिलगाव आणि सावऱ्या दिगर गावांना जोडणारा उदय नदीवरील पूल बारा वर्षांपासून अपूर्णावस्थेत रखडला होता.

पावसाळ्यात या परिसरातील अनेक गावांचा संपर्क तुटत असल्याने ग्रामस्थांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. दरम्यानच्या काळात नंदुरबार जिल्ह्याला आदिवासी विकास मंत्रिपद असतानादेखील त्या कामाला निधी मिळू शकला नव्हता. शासनदरबारी असंख्य पाठपुरावा केल्यानंतरही निधीअभावी काम अपूर्णावस्थेत होते.

१५ जून २०२३ ला उपमुख्यमंत्री अजित पवार पक्षकार्यकर्त्यांच्या मेळाव्यास नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर आले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नंदुरबार जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजित मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेस नंदुरबार जिल्हाध्यक्ष सीताराम पावरा यांनी ही बाब अजित पवार यांच्या निदर्शनास आणून दिली, तसेच या चर्चेतून पुलाचे महत्त्व त्यांना समजले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

योगायोगाने अजित पवार पुन्हा राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. त्यांच्याकडे अर्थ खाते आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजित मोरे व राष्ट्रवादी काँग्रेसचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष सीताराम पावरा यांनी अजित पवार यांच्याकडे पुनश्च या विषयाचा पाठपुरावा सुरू ठेवला.

त्यास प्रतिसाद देत श्री. पवार यांनी त्वरित ४५ कोटींचा निधी या उदय नदीच्या पुलासाठी मंजूर करून लवकरात लवकर पुलाचे काम पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

त्यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजित मोरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची देवगिरी या त्यांच्या शासकीय निवासस्थानी मुंबई येथे भेट घेऊन धडगाव व अक्कलकुवा तालुक्यातील जनतेतर्फे आभार व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India suspends postal service to US: भारताने घेतला मोठा निर्णय! आता अमेरिकेसाठी ‘पोस्टल सर्विस’ बंद

National Space Day : भारताची भविष्यातली अंतराळ झेप कशी असेल? इस्रोच्या महत्वाकांक्षी मोहिमांची A टू Z माहिती, वाचा एका क्लिकवर

Latest Marathi News Updates : सैलानी येथे दर्शनाला जात असलेल्या वाहनाचा अपघात

BEST Bus: गणेशोत्सवासाठी बेस्टची मोठी घोषणा, रात्री चालणार विशेष गाड्या; कधी आणि कुठे? जाणून घ्या

ODI World Cup 2027 साठी ठिकाणं ठरली! 'या' शहरांमध्ये खेळवले जाणार सामने

SCROLL FOR NEXT