उत्तर महाराष्ट्र

दुर्दैवी घटना : नियतीचा असा हा फेरा..तीन आठवड्यात चिमुरडे झाले पोरके 

रमेश पाटील

सारंगखेडा ः २५ दिवसांपूर्वी दुचाकी अपघातात पत्नीच्या निधनामुळे दुःखात असलेल्या पतीला कोरोनाने घेरले आणि सोमवारी (ता.२९) सकाळी सुरत येथे उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. तीन आठवड्यांच्या कालावधीत पती - पत्नीचे निधन झाल्याने त्यांची दोन्ही चिमुरडे मुले पोरके झाले.


जयेश (वय ११), हर्षवर्धन (वय ८) अशा दोन चिमूकल्यांच्या माता, पित्याचे छत्र तीन आठवड्यांचा कालावधीत हरपल्याचे बघून सर्वांच्या भावना अनावर झाल्या. आई रिंकू जमादार (वय ३२) यांचा ४ मार्च रोजी आकुलखेडा (ता. चोपडा) येथे दुचाकीवरुन पडल्याने जागीच मृत्यू झाला होता. घटनेवेळी पती अविनाश व दोन्ही मूलं सोबत होते. या दुःखातुन कुटुंब सावरत नाही तोच अविनाशला गेल्या आठवड्यात कोरोनाने ग्रासले. त्यात त्यांना सुरत येथे उपचार्थ दाखल केले. मात्र सोमवारी सकाळी उपचारांदरम्यान त्यांचे निधन झाले. तीन आठवड्याच्या कालावधीत पती, पत्नी इहलोक यात्रेला गेले व संपूर्ण कुटुंब पोरके झाले. दोन्ही मुलांचे छत्र हरपले, तर आई, वडील व भावावर दुःखाचा डोंगर कोसळला. 
 

ग्रामस्थ देखील झाले स्तब्ध..
आई, वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला. भोरखेडा (ता. शिरपुर) येथील राजपूत कुटुंबावर काळाने झडप टाकत पती पत्नीच्या दुःखाच्या खाईत लोटल्याचा प्रसंग बघून ग्रामस्थांच्या भावनाच बधीर करून गेला. 

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Annasaheb Patil Mahamandal : अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या एमडींची तडकाफडकी उचलबांगडी; अविनाश रणखांब नवे व्यवस्थापकीय संचालक

मालिका आवडली, पण नवऱ्याची भूमिका खटकली? 'आमच्या लाडक्या नाईकबाई'च्या पहिल्या भागावर चर्चांचा पूर!

Palghar Crime: प्रियकरासोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर ६ जणांचा सामूहिक अत्याचार, निर्जन बंगल्यात नेत कृत्य; तीन जण ताब्यात

Marathi News Live Updates : गरवारे महाविद्यालयासमोर तरुणींच्या दोन गटांत तुंबळ हाणामारी

Rasalgad Fort History and Tourism : स्वराज्याच्या वैभवशाली इतिहासाचा जिवंत साक्षीदार! शिवकालीन दुर्गचे पर्यटकांना आकर्षण, निसर्गरम्य रसाळगडावर मोठी गर्दी

SCROLL FOR NEXT