Doctor News
Doctor News esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : बोगस डॉक्टरांविरुद्ध मोहीम राबवावी : देवदत्त केकाण

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांचा शोध घेऊन त्यांच्याविरुद्ध शासनाने वेळोवेळी निर्देशित केलेल्या कार्यपद्धतीप्रमाणे आवश्यक कार्यवाही करण्यासाठी सर्व संबधित यंत्रणेने सामूहिक धडक मोहीम राबवावी, असे निर्देश अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात गुरुवारी बोगस वैद्यकीय व्यावसायिकांवर आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्याकरिता गठित जिल्हास्तरीय समितीची त्रैमासिक बैठक झाली. (Devdatta Kekan say campaign should be launched against bogus doctor Direction in district level committee meeting to prevent Dhule News )

त्या वेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. या वेळी पोलिस उपअधीक्षक (गृह) संभाजी पाटील, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. संतोष नवले, प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय शिंदे, महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शेख, समितीचे अशासकीय सदस्य डॉ. योगेश सूर्यवंशी, ॲड. चंद्रकांत येशीराव, सर्व तालुक्यांचे आरोग्याधिकारी आदी उपस्थित होते.

जनजागृतीवर भर द्यावा

अपर जिल्हाधिकारी केकाण यांनी सांगितले, की बोगस डॉक्टर शोधमोहिमेसाठी तालुकास्तरावर अधिकाऱ्यांची बैठक घ्यावी. बोगस डॉक्टरांबाबत गावात माहिती होण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करावी.

तसेच जिल्ह्यास्तरावर सर्व डॉक्टर, वकील, पोलिस विभाग आणि त्या संबंधित सर्व यंत्रणांसाठी कार्यशाळा घेऊन त्यात बोगस डॉक्टरांबाबात राबवावयाची धडक मोहिमेची रूपरेषा ठरवावी.बोगस डॉक्टरांकडून रुग्णांवर उपचार होणे ही गंभीर बाब आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

अहवाल सादर करावा

या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेने बोगस डॉक्टरांच्या तपासणीसाठी शासनाने गठित केलेल्या तालुकास्तरीय समितीमार्फत विशेष मोहीम राबवावी. आवश्यक तेथे पोलिस दल, अन्न व औषध प्रशासन विभागाची मदत घेऊन सांघिकपणे काम करावे. याबाबत पुढील १५ दिवसांत ठोस कार्यवाही करून अहवाल सादर करावा.

तसेच काही संवेदनशील भागात बोगस डॉक्टरांच्या शोधासाठी विशेष कृती दल गठित करण्यात यावे, असेही श्री. केकाण यांनी सांगितले. नागरिकांनीही आपल्या परिसरात असे बोगस डॉक्टर व्यवसाय करीत असल्यास जिल्हा आरोग्याधिकाऱ्यांकडे तपशील देण्याचे आवाहनही त्यांनी केले. या वेळी झालेल्या चर्चेत अशासकीय सदस्य, तालुक्यातील आरोग्याधिकारी आदींनी भाग घेऊन मौलिक सूचना केल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : लोकसभा मतदानाचा तिसरा टप्पा; १२ राज्यांमधील ९३ जागांवर आज पार पडणार मतदान

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

SCROLL FOR NEXT