jamner esakal
उत्तर महाराष्ट्र

Jamner: "महायुतीची सत्ता पुन्हा येणार", फडणवीसांना विश्वास, जामनेरमध्ये केले शिवसृष्टी-भिमसृष्टीचे लोकार्पण

Shivaji Maharaj Statue: शिवसृष्टी-भिमसृष्टीचे लोकार्पण शुक्रवारी (ता. ११) मान्यवराच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर खासदार छत्रपती उदयनराजे भोसले,आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे आदी उपस्थित होते.

सकाळ वृत्तसेवा

जामनेर, ता. ११ : गेल्या अडीच वर्षांत अनेक विकास योजना राबवून महायुती शासनाने राज्यातील शेतकरी-शेतमजूर, महिला, युवक, विद्यार्थी, अशा सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला, त्याचा लाभ आम्हाला विधानसभा निवडणुकीत नक्कीच होणार आहे. राज्यात पुन्हा महायुतीची सत्ता येणार आहे, असा विश्वास उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

येथे शिवसृष्टी-भिमसृष्टीचे लोकार्पण शुक्रवारी (ता. ११) मान्यवराच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर खासदार छत्रपती उदयनराजे भोसले,आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे, मंगेश चव्हाण, तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, नंदू महाजन, महेंद्र बाविस्कर, जितेंद्र पाटील, माधव चव्हाण, अनिस शेख आदी उपस्थित होते.

विरोधकांकडून जातीजातीत तेढ : उदयनराजे

उदयनराजे म्हणाले, की विरोधकांच्या हातात ५० वर्षे सत्ता होती. फक्त त्यांनी बोंबलण्याचेच काम केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन स्वराज्याची स्थापना केली. मात्र, विरोधक जाती-जातीत तेढ निर्माण करण्याचे काम करीत आहेत. विकासकामांच्या जोरावर मंत्री गिरीश महाजन पुन्हा सातव्यांदा मोठ्या मताधिक्याने विजयश्री खेचून आणतील, असा विश्र्वासही साताऱ्याचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केला.

महाजनांच्या पाठिशी राहा : शिवेंद्रसिंहराजे

महायुती शासनाने अनेक लोकहिताच्या योजना सुरू केल्या आहेत. लाडकी बहीण योजनेबाबत विरोधकांनी रोज टाहो फोडायला सुरुवात केली आहे. या योजनेत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकायला लागली आहे, अशी टीका शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मंत्री महाजन यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन केले.

हरितक्रांती घडविणार : मंत्री महाजन

मंत्री गिरीश महाजन म्हणाले, की शेतीला रस्ता, वीज, पाणी देण्याचा प्रयत्न करून तालुका येत्या काळात हरीतक्रांती घडवेल, असा विश्वास व्यक्त केला. नवल पाटील यांनी सूत्रसंचालन केले. चंद्रकांत बाविस्कर यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Panchgani Gas Shortage: पाचगणीत पर्यटन व्यवसायाला गॅस टंचाईची ‘झळ’;हॉटेलमध्ये पेटल्या चुली; पर्यटकांना सेवा देतानाही मोठी कसरत

Nagpur News: इम्प्रेस मॉलवरून उडी घेत विद्यार्थ्याने संपवले जीवन; शनिवारपासून होता बेपत्ता, विषही केले प्राशन

Ramwadi–Wagholi Metro: रामवाडी - वाघोली मेट्रो मार्ग, सरकारी विभागांची संयुक्त पाहणी, अडचणी व उपाययोजना बाबत चर्चा, ३ वर्षात प्रकल्प पूर्ण होणार

निवडणूक जाहीर होण्याआधी ममतांची 'खेळी', आयोगाच्या पत्रकार परिषदेआधी केली मोठी घोषणा

Eknath Shinde: उपमुख्यमंत्री शिंदेंच्या नावे चक्क पिवळं रेशनकार्ड, अज्ञातावर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT