The girl's father and villagers show the field where the girl's body was buried in Salt. esakal
उत्तर महाराष्ट्र

धडगाव अत्याचार प्रकरण : अखेर पुरलेला मृतदेह विच्छेदनासाठी मुंबईला नेला

सकाळ वृत्तसेवा

धडगाव (जि. नंदुरबार) : खडक्या (ता. धडगाव) येथील ‘त्या’ मुलीचा बापाने न्यायासाठी पुरून ठेवलेला मृतदेह बंदोबस्तात काढत तो तज्ज्ञांमार्फत विच्छेदनासाठी बुधवारी (ता. १४) मुंबईला नेण्यात आला. मुलीला न्याय मिळावा आणि दुर्लक्ष करणाऱ्यांवर आणि दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी खडक्या ग्रामस्थांनी केली आहे.

विवाहित मुलीवर अत्याचार झाल्याचे टाहो फोडून सांगणाऱ्या पित्याकडे पोलिसांनी दुर्लक्ष करीत उलट तिच्याविरोधातच आत्महत्येचा गुन्हा दाखल केल्याने हताश झालेल्या पित्याने तिला न्याय मिळावा यासाठी तिचा मृतदेह चक्क ४२ दिवस मिठाच्या खड्ड्यात पुरून ठेवण्याच्या घटनेबाबत समाजातून तीव्र धिक्कार करण्यात येत आहे. पोलिसांनी वेळीच दखल घेतली असती तर पीडितेला न्याय लवकर मिळाला असता, अशा प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

खडक्या (ता. धडगाव) येथील या घटनेबाबत तसेच अत्याचारानंतर मुलीने साधलेल्या संवादाच्या व्हायरल झालेल्या क्लिपकडे पोलिसांनी केलेले दुर्लक्ष यामुळे संबंधित पालकाने तिला न्याय मिळावा यासाठी तिच्यावर अंत्यसंस्कार न करता तिचा मृतदेह मिठामध्ये खड्ड्यात पुरून ठेवला होता.

मुलीवर अत्याचार होऊन तिचा खून करण्यात आला, तिचे शवविच्छेदन करा, अशी मागणी त्याने करूनही पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केले, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. पोलिसांनी फक्त आत्महत्येचा गुन्हा नोंदवून घेतला. शवविच्छेदन अहवालातही त्रुटी ठेवल्याचा आरोप मुलीच्या आई-वडिलांनी केला आहे.

त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने लढा सुरूच ठेवला होता. दरम्यान, मंगळवारी त्या मुलीचा मृतदेह मुंबई येथे विच्छेदनासाठी नेण्यात आला. दरम्यान, विधान परिषदचे आमदार आमश्या पाडवी यांनीही दुपारी खडक्या गावातील घटनास्थळी भेट देऊन मृतांच्या नातेवाइकांना धीर देत सखोल चौकशीसाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासित केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Russian Woman Nina Kutina: गोकर्ण जंगलाच्या गुहेत सापडलेली रशियन महिला ८ वर्ष स्वयंपाक कशी करायची? मुलींना काय खायला द्यायची?

'26 निष्पापांच्या हत्यांमागे पाकिस्तानचा हात, त्या दहशतवाद्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करणार'; जम्मूच्या उपराज्यपालांचा कडक इशारा

Walking 10000 Steps: दररोज 10,000 पावले चालल्यास काय होईल? डॉक्टरांनी सांगितले शरीरात दिसणारे 5 बदल

Gokul Milk Politics : आप्पा महाडिकांनी थेट मुश्रीफांनाच घेतलं अंगावर, कारभार चांगला, मग ‘टोकण’ कशासाठी?

Nagpur Crime: कर्जदाराचे अपहरण, जिवे मारण्याची धमकी; सावकारासह चौघांना अटक

SCROLL FOR NEXT