Filter plant machine here. The rush for water. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : 5 रुपयांत मिळते 18 लिटर थंड व शुद्ध पाणी; फिल्टर प्लान्टमुळे विविध गावांतील ग्रामस्थ तृप्त

Dhule : अठरा लिटर शुद्ध व थंड पाणी मिळत असल्याने उष्णतेच्या काळात विविध गावांतील ग्रामस्थ तृप्त होताना दिसत आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : येथील ग्रामपंचायतीने ग्रामस्थांसाठी शुद्ध व थंड पाण्याचा फिल्टर प्लान्ट बसविला असून वॉटर एटीएम मशिनद्वारे ग्रामस्थांनी एटीएममध्ये पाच रुपये टाकल्यावर अठरा लिटर शुद्ध व थंड पाणी मिळत (18 liters of cold and pure water is available for 5 rupees in kusumba village)

धुळे जिल्ह्यात अनेक ग्रामपंचायतींनी ग्रामस्थांसाठी फिल्टर प्लान्ट बसविले आहेत, मात्र जिल्ह्यासह तालुक्यातील बहुतांशी गावातील फिल्टर प्लान्ट योग्य नियोजनाअभावी वा तांत्रिक बिघाडामुळे तर काही ठिकाणी कमी मनुष्यबळामुळे बंद अवस्थेत आहेत, असे असताना कुसुंबा ग्रामपंचायतीचा फिल्टर प्लान्ट मात्र सुरळीत सुरू असल्याने भर उन्हाळ्यात थंड शुद्ध पाणी घेऊन तृप्त झालेल्या ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

ग्रामस्थ डोक्यावर, सायकलसह मिळेल त्या वाहनाने पाणी घेऊन जातात तसेच जवळील कावठी, अजनाळे, चौगाव येथीलही ग्रामस्थ पाणी घेण्यास येतात. अवघ्या पाच रुपयांत अठरा लिटरचा शुद्ध व थंड पाण्याचा ड्रम व जार वॉटर एटीएम मशिनच्या सहाय्याने ग्रामस्थांना भरून मिळत आहे. संबंधित फिल्टर प्लॉन्ट माजी जि.प.सदस्या वैशाली शिंदे यांच्या कार्यकाळात त्यांच्या शेष फंडातून ग्रा.पं.तीला देण्यात आला.

एप्रिल, मे व जून महिन्यात फिल्टर प्लान्टला पाण्याची साठवणूक क्षमता कमी पडत असल्याने येथील म्हाडा माजी सभापती किरण शिंदे व माजी लोकनियुक्त सरपंच शोभाबाई शिंदे यांच्या विनंतीवरून कुसुंबा येथीलच मात्र धुळेस्थित सुनील नेरकर व कुसुंब्यांतील सामाजिक कार्यकर्ते प्रफुल्ल (छाटूबापू)शिंदे या द्वयींनी समाजहितार्थ प्रत्येकी तीन हजार लिटर्सच्या दोन टाक्या स्वखर्चातून उपलब्ध करून दिल्याने ग्रामस्थांना शुद्ध व थंड पाणी देणे अखंडित सुरू आहे.(latest marathi news)

तत्कालीन बीडीओंकडून प्रशंसा

काही लोक प्रतिनिधींनी गैरसमजुतीतून तक्रार केल्याने तत्कालीन बीडीओ सत्यम गांधी यांनी प्रत्यक्ष प्लान्टला भेट देत पाहणी केली. स्वतः पाण्याचा आस्वाद घेत प्रशंसा केली होती. येथील पाणी घेण्यासाठी गावातील मोठे व लघु व्यावसायिक, शेतकरी, शेतमजूर, व्यापारी, हॉटेल व्यावसायिक, विविध शाळा, विविध कार्यालये, दवाखाने, प्रा.आ.केंद्र, बांधकाम व्यावसायिक आदींसह सर्वसामान्य पाण्याचा उपयोग करून समाधान व्यक्त करीत आहेत. यासाठी प्रशासक एन.आर.पाटील, ग्रामविकास अधिकारी बी.एस.पाटील, माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य, कर्मचारी यांचे सहकार्य आहे.

''या फिल्टर प्लान्टचे पाणी पाच रुपयांत मिळत असल्याने समाधानी आहे. आता पाच रुपयांत चॉकलेटही येत नाही. येथे पाच रुपयांत अठरा लिटर थंड व शुद्ध पाणी मिळते. अजून काय हवे. परिवारासह माझ्या बांधकामाच्या ठिकाणी असलेल्या कामगारानांही शुद्ध व थंड पाणी मिळते.''- नीलेश नेरकर, व्यावसायिक व ग्रामस्थ

''पाच रुपयांत मिळणारे थंड पाणी तृप्त करते, इतर ठिकाणी फिल्टर पाणी महाग असते. हॉटेलमध्ये २० रुपयाला एक लिटर पाणी मिळते. येथे चक्क पाच रुपयांत अठरा लिटर थंड व शुद्ध पाणी मिळते ते सामान्यांना परवडत असून योजना प्रशंसनीय आहे.''- दशरथ चव्हाण, पेन्टर व टेल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China criticizes US: भारताची बाजू घेत चीनने पुन्हा एकदा अमेरिकेवर केली उघडपणे टीका, म्हटले...

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT