Female candidates participating in the district police force recruitment process at the police drill ground on Sunday. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Police Recruitment : महिला पोलिस भरती चाचणीत 321 पात्र, 60 उमेदवार बाद!

Dhule News : पुरुष उमेदवारांची भरती प्रक्रिया झाल्यानंतर रविवारी (ता.२३) महिला उमेदवारांची चाचणी घेण्यात आली.

सकाळ वृत्तसेवा

धुळे, ता.२३ : जिल्हा पोलिस दलात ५७ जागांसाठी सुरू असलेल्या भरती प्रक्रियेत रविवारी (ता. २३) महिला उमेदवारांची मैदानी चाचणी झाली. यात उपस्थितांपैकी ३२१ उमेदवार पुढील चाचणीसाठी पात्र ठरल्या तर ६० उमेदवार विविध कारणांनी भरती प्रक्रियेतून बाद झाल्या. (Dhule 321 qualified in women police recruitment)

धुळे जिल्हा पोलिस दलातील भरतीसाठी एकूण दोन हजार ४७५ उमेदवारांनी अर्ज केले. यात एक हजार ९०३ पुरुष, २६ माजी सैनिक व ५४६ महिला उमेदवारांचा समावेश आहे. या उमेदवारांची धुळ्यात १९ जूनपासून मैदानी चाचणी प्रक्रिया सुरू आहे.

पुरुष उमेदवारांची भरती प्रक्रिया झाल्यानंतर रविवारी (ता.२३) महिला उमेदवारांची चाचणी घेण्यात आली. त्यासाठी ५०० उमेदवारांना बोलाविण्यात आले. मात्र, यातील ११९ उमेदवार गैरहजर होत्या. ३८१ उमेदवार चाचणीसाठी हजर होते. त्यापैकी ३२१ उमेदवार पुढील चाचणीसाठी पात्र ठरल्या, इतर ६० उमेदवारांना विविध कारणांनी बाद ठरविण्यात आले. (latest marathi news)

पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, गृह विभागाच्या उपअधीक्षक शिल्पा पाटील यांच्या देखरेखीखाली रविवारी (ता.२३) पहाटेपासून महिला उमेदवारांच्या भरती प्रक्रियेला सुरवात झाली. पोलिस भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने होण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे, व्हिडीओग्राफीसह विविध उपाययोजना केल्याचे पोलिस दलाने भरती प्रक्रियेपूर्वीच म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: २६९, १००* ! शुभमन गिलचे शतक अन् ५४ वर्षांपूर्वीचा विक्रम उद्ध्वस्त; एकाही भारतीयाला नव्हता जमला हा पराक्रम

Eknath Shinde Reaction : ‘’मी जर पूर्ण दाढीवरून हात फिरवला असता, तर..’’ ; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा!

IND vs ENG 2nd Test: बॅट निसटली, विकेट गेली! Rishabh Pant च्या आक्रमणाला ब्रेक, मोडला ५९ वर्षांपूर्वीचा विक्रम, Viral Video

कसलं भारी! आईच्या वाढदिवसाला लेकीने आणला मालिकांचा केक; जन्मदात्रीचा आनंद गगनात मावेना, Video Viral

Ashadhi Wari: दिंडीत मोकाट जनावरांचा हल्ला; अनेकजण जखमी, चिमुकल्यांचाही समावेश

SCROLL FOR NEXT