Dhule municipal team while recovering fines from traders along with confiscation of plastic stock. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Municipality News : प्लॅस्टिक व्यापाऱ्यांना 35 हजार दंड; मनपा पथकाची कारवाई

Dhule Municipality : शासनाने बंदी घातलेले प्लॅस्टिक गोडाऊनमध्ये आढळल्याने धुळे महापालिकेच्या पथकाने संबंधित दोन व्यापाऱ्यांकडून ३५ हजार रुपये दंड वसूल केला.

सकाळ वृत्तसेवा

Dhule Municipality News : शासनाने बंदी घातलेले प्लॅस्टिक गोडाऊनमध्ये आढळल्याने धुळे महापालिकेच्या पथकाने संबंधित दोन व्यापाऱ्यांकडून ३५ हजार रुपये दंड वसूल केला. कारवाईत पथकाने दोन टन प्लॅस्टिक मालही जप्त केला.

महापालिका आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे-पाटील, उपायुक्त यांच्या आदेशाने महापालिकेचे पथक बुधवारी (ता. २१) शहरातील चाळीसगाव रोड परिसरातील एका प्लॅस्टिक गोडाऊनमध्ये कारवाईसाठी गेले.

तेथे दोन टन प्लॅस्टिक आढळून आले. या प्रकरणी पथकाने सतीश राधेश्याम सिंधी यांना २५ हजार रुपये, तर प्रकाशभाई सिंधी यांना दहा हजार रुपये असा एकूण ३५ हजार रुपये दंड केला. दंडाची ही रक्कम पथकाने संबंधित व्यापाऱ्यांकडून वसूल केली.

मुख्य स्वच्छता निरीक्षक राजेश वसावे, प्लॅस्टिक बंदी पथकप्रमुख लक्ष्मण पाटील, स्वच्छता निरीक्षक संदीप मोरे, शुभम केदार, साईनाथ वाघ, मनीष आघाव, रूपेश पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली. महापालिकेच्या पथकाकडून अधूनमधून प्लॅस्टिक बंदीबाबत कारवाया होतात.

मात्र, यातून प्लॅस्टिक विक्री, वापराला लगाम लागत नसल्याचे चित्र पाहायला मिळते. एखाददोन व्यापाऱ्यांकडूनच टनोगणती प्लॅस्टिक जप्त केले जाते. याचा अर्थ शहरात मोठ्या प्रमाणावर प्लॅस्टिकचा साठा आहे.

त्यामुळे विक्री, वापरही स्वाभाविकपणे होत असल्याचे दिसते. बाजारात आज कोणत्याही छोट्या-मोठ्या विक्रेत्याकडून ग्राहकांना प्लॅस्टिक कॅरिबॅग सहज उपलब्ध केली जाते. त्यामुळे अशा थातुरमातुर कारवाईतून काहीही साध्य होत नसल्याचेच दिसते.

सर्रास विक्री, वापर होत असताना अशा एक-दोन कारवायांमुळे ज्यांच्यावर कारवाई होते त्यांना दंड बसतो इतर व्यापारी मात्र कारवाईच्या कचाट्यातून सुटतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MLA Prakash Solanke : मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला प्रकाश सोळंके यांचा पाठिंबा; सोशल मीडियावर 'मी येतोय तुम्ही या'चे आवाहन

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

पोलिस भरतीचे वेळापत्रक ठरलं! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; वयोमर्यादा संपलेल्या ‘या’ उमेदवारांना एक संधी; अर्जासाठी ४५० ते ३५० रुपये शुल्क

Donald Trump: ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वीचे अपशकुन अन् दुर्याेधनाच्या जन्माची वेळ; भारतावरचं सर्वात मोठं संकट?

Maharashtra Latest News Update: राज्यासह देशात आज दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT