Amrishbhai Patel, Kashiram Pawra esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : रस्ते, पुलांसाठी 62, पाझर तलाव दुरुस्तीसाठी साडेनऊ कोटी मंजूर

Dhule News : सलईपाडा पाझर तलाव दुरुस्तीसाठी आठ कोटी ६६ लाख तर बांगडी विहीर पाझर तलाव दुरुस्ती कामासाठी ५४ लाख रुपयांच्या निधीस तांत्रिक मंजुरी देण्यात आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

शिरपूर : तालुक्यातील रस्ते काँक्रीटीकरण व पुलांच्या कामासाठी पुरवणी अर्थसंकल्पातून साठी ६२ कोटी ३० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सलईपाडा व बांगडीविहिर येथील पाझर तलाव दुरुस्तीसाठी सुमारे साडेनऊ कोटी रुपयांच्या निधीस मान्यता मिळाली आहे. (62 for roads bridges nine half crore approved for Pazar lake repair)

मंजूर कामांमध्ये तालुक्यातील पळासनेर हाडाखेड रस्ता, पळासनेर गावांतर्गत काँक्रीटीकरण, सांगवी-होऱ्‍यापाणी-वरझडी रस्ता, वरझडी ते शिरपूर रस्त्यावर तुटलेल्या पाईप मोरीच्या ठिकाणी लहान पूल बांधणे, आवश्यक ठिकाणी संरक्षक भिंतीचे बांधकाम करणे, अभाणपूर-तर्‍हाडी-अंतुर्ली-टेकवाडे-रुदावली - वनावल-जातोडे-शिंगावे रस्ता काँक्रीटीकरण, तर्‍हाडकसबे-जळोद-अभाणपूर खुर्द रस्त्याचे पुलासह बांधकाम, तर्‍हाडकसबे-जळोद-अभाणपूर रस्ता सुधारणा,

सुळे ते लाकड्या हनुमान-रोहिणी रस्ता काँक्रीटीकरण, पर जिल्हा मार्ग पाच ते जामन्यापाणी रस्ता डांबरी नूतनीकरण, रस्ता काँक्रीटीकरण, आंबे ते खड्डापाडा-भोईटी रस्ता सुधारणा, जुनापाणी फाटा ते अंबडपाडा रस्ता सुधारणा, परजिल्हा मार्ग आठ ते पिंप्राडपाडा रस्ता बांधकाम, रुमालीपाडा ते जगदीशपाडा रस्ता बांधकाम, परजिल्हा मार्ग ७० ते जुनापाणी डाबक्यापाडा रस्ता डांबरी नूतनीकरण व बांधकाम, बोरपाणी ते सुभानपाडा रस्ता बांधकाम, परजिल्हा मार्ग ५ ते कालापाणी रस्ता सुधारणा, न्यू बोराडी-चोंदीपाडा रस्ता जल:निसारणाच्या कामासह रस्त्याचे बांधकाम करणे, परजिल्हा मार्ग ६४ ते कन्हेरीपाडा रस्ता सुधारणा, तिखीबर्डी ते देवमोगरा प्रस्तावित रस्त्याचे बांधकाम. (latest marathi news)

कढईपाणी ते प्रधानदेवी प्रस्तावित ग्रामीण मार्गाचे बांधकाम, परजिल्हा मार्ग ७० ते सामऱ्‍यादेवी प्रस्तावित ग्रामीण मार्गाचे बांधकाम, गुऱ्‍हाळपाणी ते थुवानपाणी प्रस्तावित ग्रामीण मार्गाचे बांधकाम, थुवानपाणी ते निशानपाणी रस्ता प्रस्तावित ग्रामीण मार्गाचे बांधकामाचा समावेश आहे. यासह सलईपाडा पाझर तलाव दुरुस्तीसाठी आठ कोटी ६६ लाख तर बांगडी विहीर पाझर तलाव दुरुस्ती कामासाठी ५४ लाख रुपयांच्या निधीस तांत्रिक मंजुरी देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis Onion Crop : कांदा उत्पादकांचा प्रश्न निकाली निघणार? देवेंद्र फडणवीसांनी केंद्रात केलं बैठकीचं आयोजन; विरोधकांवरही टीका

LPG Alternative India : महाग 'एलपीजी'ला पर्याय! नितीन गडकरी यांनी लॉंच केली स्वस्त आणि पर्यावरणपूरक इथेनॉल शेगडी

Everest Base Camp: दादांची शिकवण अन् लेकीची जिद्द; नयना बोऱ्हाडे यांची एव्हरेस्ट बेस कॅम्पवर दमदार कामगिरी

Latest Marathi News Live Update : बीडमधील गेवराई शहरात घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने घर जळून खाक

पंतप्रधान मोदींची 12 वर्षे पूर्ण! फडणवीस-चव्हाणांनी मांडला विकास आणि राष्ट्रनिर्मितीचा लेखाजोखा; ‘नव्या भारताची’ दिशा सांगितली

SCROLL FOR NEXT