crime esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : 7 अट्टल गुन्हेगार वर्षभरासाठी हद्दपार; तिघे जिल्ह्यातून, चौघे खानदेशातून

Dhule : जिल्ह्यातील सात अट्टल गुन्हेगारांना वर्षासाठी हद्दपार करण्यात आले.

सकाळ वृत्तसेवा

Dhule Crime News : जिल्ह्यातील सात अट्टल गुन्हेगारांना वर्षासाठी हद्दपार करण्यात आले. याबाबत उपविभागीय दंडाधिकाऱ्यांचा आदेश प्राप्त झाला आहे. त्यानुसार तिघांना धुळे जिल्ह्यातून, तर चौघांना खानदेशातून हद्दपार करण्याचा आदेश आहे. आगामी निवडणुका व सण-उत्सवाच्या अनुषंगाने सराईत गुन्हेगारांचे अभिलेख तपासून तरतुदीनुसार ही कारवाई झाली. अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांच्यामार्फत वेळोवेळी आढावा घेण्यात येत आहे. ( 7 inveterate criminals deported for year in district)

त्यानुसार देवपूर, धुळे शहर, चाळीसगाव रोड व शिरपूर शहर पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी सराईत गुन्हेगारांना हद्दपार करण्याबाबत प्रस्ताव सादर केला होता. ते गुंड असे ः अशोक रमेश पानथरे (वय २३, रा. विद्यानगर, देवपूर, धुळे), राहुल ऊर्फ टाल्या गजानन थोरात (वय ३१, रा. रंगारी चाळ, धुळे), पापा गोल्डन ऊर्फ हाशिम हारून पिंजारी (वय २७, रा. अंजनशाह सोसायटी, पूर्व हुडकोमागे, धुळे) याला धुळे जिल्ह्यातून, तर समीर गफ्फार शेख (वय २४, रा. अंबिकानगर, शिरपूर), आदिल अलाद्दीन अल्ताप शेख (रा. महिना मोहल्ला, शिरपूर), दिलीप सुदाम कोळी ऊर्फ धाप दिल्या (रा. अंबिकानगर, शिरपूर) व अमृत आनंदा पाटील (रा. उपरपिंड, ता. शिरपूर) याला धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यातून वर्षासाठी हद्दपार करण्यात आले.

ही कारवाई पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलिस अधीक्षक हृषीकेश रेड्डी, एलसीबीचे पोलिस निरीक्षक श्रीराम पवार, आझादनगर पोलिस ठाण्याचे तत्कालीन निरीक्षक सतीश घोटेकर, शहर पोलिस ठाण्याचे तत्कालीन निरीक्षक आनंद कोकरे, धुळे शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक धीरज महाजन, शिरपूर शहराचे तत्कालीन निरीक्षक अन्साराम आगरकर, हवालदार संतोष हिरे, कबीर शेख, संजय सूर्यवंशी, भटू बैसाणे, रमाकांत पवार, जब्बार शेख, हर्शल चौधरी यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: हैदराबादचा राजस्थानवर दणदणीत विजय! ईशान-अभिषेकच्या खेळीनं वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ; Points Table मध्ये उलथापालथ

Vaibhav Sooryavanshi: राजस्थान रॉयल्सला धक्का! वैभव शतकानंतर फिल्डिंग करताना लंगडत गेला मैदानातून बाहेर; नेमकं काय घडलं?

Vaibhav Sooryavanshi चे दुसरे शतक! तब्बल १२ षटकारांचा पाऊस पाडत IPL मध्ये ऐतिहासिक कारनामा; १९ वर्षात पहिल्यांदाच असं घडलं

Launch Service : मुळशी ते वाघवाडी प्रवासी लाँचसेवेचे लोकार्पण; १६ गावांतील ग्रामस्थांना होणार फायदा

SMT Heritage Scare: सीएसएमटी हेरिटेज स्थानकात ‘पॅरानॉर्मल’ कोड, गूढ चिन्हांनी खळबळ; काळी जादू, सुरक्षा आणि वारसा संरक्षणावर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT