Dhule Accident sakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Accident : ट्रकने वाहनाला दीड किलोमीटरपर्यंत फरफटत नेलं; अपघातात पत्रकार हर्षल भदाणेंचा मृत्यू

Harshal Bhadane Accident: भरधाव ट्रकने चिरडलेल्या वाहनास जवळपास अर्धा ते एक किलोमीटरपर्यंत फरफट नेले. परिसरातील नागरिकांनी ट्रकचा पाठलाग केला. त्यामुळे बिथरलेल्या ट्रक चालकाने आणखी दोन वाहनांना उडवले.

संतोष कानडे

Dhule News : धुळ्यामध्ये भीषण अपघाताची घटना घडली आहे. भरधाव वेगात असलेल्या ट्रकने दुसऱ्या वाहनाला जोराची धडक देऊन तब्बल एक ते दीड किलोमीटरपर्यंत फरफटत नेलं. या घटनेत पत्रकार हर्षद भदाणे यांचा मृत्यू झाला आहे.

(Harshal Bhadane Accident)

धुळे शहरापासून काही किलोमीटर अंतरावर हा अपघात झाला. ट्रकवरील नियंत्रण सुटलेल्या चालकाने काही वाहनांना चिरडले. या विचित्र अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.

घटना एवढी भीषण होती की, भरधाव ट्रकने चिरडलेल्या वाहनास जवळपास अर्धा ते एक किलोमीटरपर्यंत फरफट नेले. परिसरातील नागरिकांनी ट्रकचा पाठलाग केला. त्यामुळे बिथरलेल्या ट्रक चालकाने आणखी दोन वाहनांना उडवले.

या घटनेमध्ये पत्रकार हर्षल भदाणे यांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी ट्रक चालक व वाहकास ताब्यात घेतले आहे. घटनेनंतर संतप्त नागरिकांनी ट्रकवर दगडफेक करत ट्रकच्या काचा फोडल्या.

अपघातातील जखमींना धुळे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे. पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतलं आहे. अपघातात मृत पावलेले हर्षल भदाणे हे सध्या 'टाईम्स नाऊ मराठी'साठी काम करत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission ची पुणे अन् दिल्लीत 'या' तारखेला महत्त्वाची बैठक, सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढ अन् पेन्शनबाबत होणार मोठा निर्णय?

आशा भोसलेंची कशी आहे प्रकृती? तब्येतीबाबत पंतप्रधान मोदींची पोस्ट, नातीने दिली हेल्थ अपडेट, म्हणाली, 'चेस्ट इन्फेक्शनमुळे...'

Breaking News Live Update: खासदार ओमराजे निंबाळकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत एकत्र येणं टाळले

IPL 2026: लखनौचा चौधरी केंद्रस्थानी; गुजरात टायटन्स संघाविरुद्ध आज सामना, कशी असेल प्लेइंग-११

Nanded News: माहूर तालुक्यातील अवैध वाळू उत्खननासाठी पैनगंगा ‘आंदण’; ट्रेझर बोटींसह जेसीबी व पोकलँड मशीनचा वापर, पर्यावरणाला धोका

SCROLL FOR NEXT