Municipal Corporation team removing unauthorized hoardings on Malegaon Road in the city. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई सुरू! महापालिकेची धडक मोहीम; पथकाने चार होर्डिंग उतरविले

Dhule News : काही दिवसांपूर्वी मुंबई येथील घाटकोपर व वडाळा येथे अनधिकृत होर्डिंग पडून जीवित व वित्तहानी झाली.

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : महापालिका क्षेत्रातील बेकायदेशीर, अनधिकृत होर्डिंग/बॅनर काढण्यास महापालिकेच्या यंत्रणेने गुरुवार (ता. ६)पासून सुरवात केली. पहिल्या दिवशी चार मोठे होर्डिंग्ज क्रेन, कटर मशिनद्वारे उतरविण्यात आले. (Dhule Action on unauthorized hoardings started)

काही दिवसांपूर्वी मुंबई येथील घाटकोपर व वडाळा येथे अनधिकृत होर्डिंग पडून जीवित व वित्तहानी झाली. त्याची पुनरावृत्ती धुळे शहरात होऊ नये, पावसाळ्यात वादळी वाऱ्यामुळे मोठी दुर्घटना घडू नये यासाठी शहरातील बेकायदेशीर, अनधिकृत होर्डिंग/बॅनर काढण्याची मोहीम शासन आदेशानुसार आयुक्‍त तथा प्रशासक अमिता दगडे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आली आहे.

यासाठी स्वतंत्र अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उपायुक्त हेमंत निकम व सहाय्यक आयुक्त समीर शेख यांच्या नियंत्रणात ही कारवाई सुरू करण्यात आली. गुरुवारी धुळे शहरातील मालेगाव रोडवरील डी- मार्टजवळील तीन व शंभर रस्त्यावरील एक असे चार अनधिकृत होर्डिंग्ज क्रेन, कटर मशिनद्वारे उतरविण्यात आले. सहाय्यक अभियंता चंद्रकांत उगले, शाखा अभियंता एन. के. बागूल, अतिक्रमण निर्मूलन विभागप्रमुख प्रसाद जाधव, जाहिरात विभागप्रमुख राजेंद्र माईनकर व इतर अधिकारी-कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. (latest marathi news)

तीन दिवसांची मुदत

दरम्यान, होर्डिंग असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी विनंती केल्याने संबंधित होर्डिंग मालकांना असे होर्डिंग उतरविण्यासाठी अंतिम तीन दिवसांची मुदत देण्यात आली आहे. या मुदतीत होर्डिंग न हटविल्यास सोमवार (ता. ९)पासून मनपामार्फत ती हटविली जातील, असा इशारा महापालिकेकडून देण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra School: राज्यात देशभक्तीचा सूर घुमणार! सर्व शाळांमध्ये ‘वंदे मातरम’ गीत बंधनकारक, महायुती सरकारचा मोठा निर्णय

Aadhaar Card Update Fees : महत्त्वाची बातमी! १ नोव्हेंबरपासून आधारकार्ड अपडेटसाठी शुल्कात झाला बदल

भारताचा पराभव अन् शिवम दुबेचा २१५१ दिवसांच्या वर्ल्ड रेकॉर्डला लागला ब्रेक; असा पराक्रम करणारा जगातील एकमेव खेळाडू

Dev Diwali 2025: यंदा देव दिवाळी ४ की ५ नोव्हेंबरला? जाणून घ्या तारीख, वेळ अन् शुभ मुहूर्त एकाच क्लिकवर

Latest Marathi News Live Update : मुलुंड आणि भांडुप मधील मेट्रो चारच्या स्पेशल स्टील स्नॅप बसवण्याकरता पुढील दोन दिवस हा रस्ता मध्यरात्रीपासून सकाळपर्यंत दोन दिवस बंद असणार

SCROLL FOR NEXT