tur dal  esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Agriculture News : तुरीला बाजार समितीत उच्चांकी दर; दुष्काळी स्थितीत उत्पादन घटले तरीही 10 हजार प्रतिक्विंटल दर

Dhule Agriculture : जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने तुरीचे उत्पादन सर्वत्र घटल्याचे चित्र आहे.

सकाळ वृत्तसेवा

गोरख गर्दे ः सकाळ वृत्तसेवा

Dhule Agriculture News : जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने तुरीचे उत्पादन सर्वत्र घटल्याचे चित्र आहे. याचा परिणाम बाजारात मागील वर्षीच्या तुलनेत तुरीची मोठ्या प्रमाणात आवक घटली आहे. त्यामुळे कृषी बाजार समितीत तुरीला उच्चांकी दहा हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे. धुळे बाजार समितीत जिल्ह्यातील अन्य बाजार समित्यांपेक्षा तुरीला जास्त दर मिळाला असल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. ()

जिल्ह्यात बागायतीसह कोरडवाहू शेतीचे प्रमाणदेखील मोठ्या प्रमाणात आहे. त्या तुलनेत तुरीचे सरासरी क्षेत्र अत्यंत अल्प आहे. अनेक शेतकऱ्यांचा तूर उत्पादनाकडे कल नसतो. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेने यंदा तुरीची आवक मोठ्या प्रमाणात घटली. मागील वर्षीच्या दरापेक्षा यंदाचे दर अधिक आहेत.

सध्या तुरीचा दर

सध्या सरासरी नऊ हजार ९०० ते दहा हजार इतका दर तुरीला मिळाला आहे. बाजार समितीत शेतकऱ्यांच्या मालास समाधानकारक दर मिळतोच. यंदा पर्जन्यमान घटल्यामुळे शेतकरी हवालदिल असताना तुरीला चांगला दर मिळत असल्याने उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यातील शिरपूर, दोंडाईचा, साक्री बाजार समित्यांपेक्षा तुरीला जास्त दर मिळण्यासाठी धुळे बाजार समिती अव्वल ठरत आहे. (latest marathi news)

समितीत अशी आवक

बाजार समितीत तारीखनिहाय क्विंटल (कमीत कमी दर) आवक अशी : ८ मे- सामान्य सहा (नऊ हजार २००), ७ मे- सामान्य आठ (आठ हजार ७००) व लाल पाच क्विंटल (आठ हजार), ६ मे- सामान्य एक (साडेनऊ हजार) व लाल २१ क्विंटल (आठ हजार ७५०), ४ मे- लाल आठ क्विंटल (नऊ हजार २७०), ३ मे- सामान्य दोन (नऊ हजार), लाल पाच क्विंटल (नऊ हजार ६७५), २ मे- सामान्य १७ (नऊ हजार ६००), हायब्रिड सहा क्विंटल (सात हजार) तसेच लाल दहा क्विंटल (नऊ ६००).

बाजार समितीत तुरीचे दर (प्रतिक्विंटल रुपये)

तारीख......सर्वाधिक......सर्वसाधारण

* ८ मे......१०,०००......९,७००

* ७ मे......९,९५१......९,७००

* ६ मे......९,९००......९,७००

* ४ मे......९,२७०......९,२७०

* ३ मे......१,००००......९,७५०

* २ मे......९,९००......९,९००

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT