A car damaged by a mob. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Riot News : दोंडाईचात सर्व व्यवहार ठप्प! दोन गटांत दगडफेक; पोलिसांकडून स्थिती नियंत्रणात

Latest Crime News : शहरात गुरुवारी बाजाराचा दिवस असतो. त्यामुळे पंचक्रोशीतील नागरिकांकडून खरेदी-विक्रीचे व्यवहार होतात. मात्र, दोन गट समोरासमोर आल्यावर दगडफेक सुरू झाली अन...

सकाळ वृत्तसेवा

दोंडाईचा : क्षुल्लक कारणावरून दोंडाईचा शहरात दोन विभिन्न गटांत गुरुवारी (ता. १९) सकाळी अकरानंतर एकमेकांवर दगडफेक झाली. त्यात वाहनांचे नुकसान करण्यात आले. घटनास्थळी दगडे, विटांचा खच पडला होता. या घटनेमुळे दोंडाईचातील सर्व व्यवहार ठप्प झाले. जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे नऊ तास तळ ठोकून होते. पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवल्यावर सायंकाळनंतर तणावपूर्ण शांतता कायम होती. (All transactions stopped in Dondaicha due to riot)

शहरात गुरुवारी बाजाराचा दिवस असतो. त्यामुळे पंचक्रोशीतील नागरिकांकडून खरेदी-विक्रीचे व्यवहार होतात. मात्र, दोन गट समोरासमोर आल्यावर दगडफेक सुरू झाली. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण होऊन व्यावसायिकांनी तत्काळ दुकाने बंद केली.

सायंकाळनंतरही तणाव कायम असल्याने लाखोंचा व्यवहार ठप्प पडला. शाळा- महाविद्यालयांत गेलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा जीवही टांगणीला होता. पोलिसांनी शहरावर ताबा घेतल्यावर, जमावाला पांगविल्यावर स्थिती नियंत्रणात आली.

घटनेत एक पोलिस कर्मचारी जखमी झाला; तर एका युवकाच्या पायाला दुखापत झाली. जमावाने काही वाहनांची तोडफोड केली. दगडफेकीची घटना स्टेट बँकेजवळ घडल्याने एटीएम बंद करण्यात आले. बँकेचा व्यवहार थांबविण्यात आला. शहरात शुकशुकाट कायम होता. ड्रोन कॅमेऱ्याने स्थिती टिपण्यात आली. संशयितांवर पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी सामान्य नागरिकांकडून करण्यात आली. रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली.

पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, प्रांताधिकारी शरद मंडलिक, अप्पर तहसीलदार संभाजी पाटील, मुख्याधिकारी देवेंद्रसिंग परदेशी, शिरपूर उपविभागीय पोलिस अधिकारी भागवत सोनवणे, ‘एलसीबी’चे पोलिस निरीक्षक श्रीराम पवार, पोलिस निरीक्षक किशोरकुमार परदेशी, शिंदखेड्याचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब थोरात, नरडाण्याचे नीलेश मोरे, निजामपूर पोलिस ठाण्याचे मयूर भामरे, थाळनेरचे निरीक्षक शत्रुघ्न पाटील आदींनी स्थिती नियंत्रणासाठी प्रयत्न केले. (latest marathi news)

पोलिसांसह नेत्यांचे शांततेचे आवाहन

दोंडाईचात कडक बंदोबस्त आहे. स्थितीवर लक्ष ठेवून आहे. अफवांवर विश्वास ठेवू नये. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला तर कठोर कारवाई केल्याशिवाय राहणार नाही. शांतता राखावी, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी केले.

आमदार जयकुमार रावल यांनी, ‘अफवांना बळी पडू नये, शांतता राखावी, दोंडाईचा शांतताप्रिय असून, सर्व जण गुण्यागोविंदाने राहतात, त्यामुळे या घटनेला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करू नये, वातावरण बिघडवू नये, दैनंदिन जीवनमान सुरू ठेवावे,’ असे आवाहन केले. तसेच, शांतता राखण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे संदीप बेडसे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्‍याम सनेर यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

12 वर्षांच्या निष्ठेचा सन्मान! जातेगावचे कैलास उगले ठरले मानाचे वारकरी; आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजेचा मिळाला मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विठ्ठल मंदिरात दाखल, महापूजेला सुरुवात

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

SCROLL FOR NEXT