sahaj shiksha learning app esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News: धुळ्यात ‘सहज शिक्षण लर्निंग अ‍ॅप’ची निर्मिती : अनुप अग्रवाल; 5वी ते 10साठी व्हिडीओ, ग्राफिक्सद्वारे शिक्षणास उपयुक्त

Latest Dhule News : या अ‍ॅपचे शुक्रवारी (ता. २७) शहरातील जे. आर. सिटी शाळेत लोकार्पण करण्यात आले, अशी माहिती ॲपचे निर्माते तथा भाजपचे धुळे शहर विधानसभा क्षेत्रप्रमुख अनुप अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : पाचवी ते दहावीच्या मराठी, इंग्रजी, सेमी इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी ‘सहज शिक्षा लर्निंग अ‍ॅप’ उपलब्ध झाले आहे. या अ‍ॅपचे शुक्रवारी (ता. २७) शहरातील जे. आर. सिटी शाळेत लोकार्पण करण्यात आले, अशी माहिती ॲपचे निर्माते तथा भाजपचे धुळे शहर विधानसभा क्षेत्रप्रमुख अनुप अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली. (Creation of Sahaj Shikshan Learning App)

श्री. अग्रवाल म्हणाले, की सहज शिक्षा लर्निंग अ‍ॅप विद्यार्थ्यांना व्हिडिओ आणि ग्राफिक्सद्वारे शिक्षण घेण्यास अत्यंत उपयुक्त आहे. पालकांना आपली पाल्ये मोबाईलमध्ये काय करतात हे समजून येत नाही. मात्र, अ‍ॅपच्या माध्यमातून विद्यार्थी जे शिक्षण घेतील त्याची इत्यंभूत माहिती पालकांना मिळेल. कारण, अ‍ॅपमध्ये विद्यार्थी जो धडा शिकला की त्या धड्याचे अ‍ॅपमध्ये रेकॉर्ड बनते. त्यामुळे आपला पाल्य अ‍ॅपमध्ये काय शिकला हे पालकांनाही पाहता येईल.

सर्व विषयांची हाताळणी

अ‍ॅपच्या माध्यमातून भाषा, गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल असे सर्व विषय हाताळता येतील. अ‍ॅपद्वारे केवळ लर्निंग प्रक्रियाच होणार नाही, तर गरजेनुसार प्रश्नपत्रिकादेखील असतील. त्या आधारे परीक्षादेखील घेण्यात येतील. त्यामुळे सहज शिक्षा लर्निंग अ‍ॅप विद्यार्थ्यांचा शिक्षक म्हणूनच भूमिका बजावेल. (latest marathi news)

पहिला टप्प्यात दहा हजार विद्यार्थ्यांना अ‍ॅप उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यासाठी शाळांकडून साडेआठ हजार विद्यार्थ्यांचा विदा (डेटा) आतापर्यंत उपलब्ध झाला आहे. हे अ‍ॅप पालकांच्या मोबाईलमध्येही असेल, असे श्री. अग्रवाल यांनी स्पष्ट केले.

एका घरात एका मोबाईलला ॲप

एका घरात एकाच मोबाईलमध्ये अ‍ॅपची सुविधा दिली जाईल. त्यासाठी पालकांना संपर्क साधून एक लिंक दिली जाईल. लिंकच्या माध्यमातून सर्व माहिती भरून पालक अ‍ॅप मोबाईलमध्ये डाउनलोड करून घेतील. ते विद्यार्थ्यांसाठी पालकांच्या मोबाईलद्वारे उपलब्ध होईल. एका घरात दोन किंवा तीन विद्यार्थी पाचवी ते दहावी वर्गातील असतील, तर पालकांनी पाल्यांच्या अभ्यासाच्या वेळेनुसार त्यांना आपला मोबाईल उपलब्ध करून द्यावा लागेल, असेही श्री. अग्रवाल यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Kisan Yojana News: पीएम किसान योजनेच्या २१ व्या हप्त्याबाबत नवीन अपडेट; जाणून घ्या, २००० रुपये कधी येणार?

Ambulance Fire : मध्यरात्री लातूरकडे जाताना ॲम्बुलन्स जळून खाक! डॉक्टरांनी दाखवले प्रसंगावधान, महिलेचा जीव वाचला

Dharur Police : दिवाळीच्या गर्दीत हरवलेली पर्स पोलिसांच्या तत्परतेमुळे परत मिळाली; एकग्राम सोने व नगद केली परत

IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरुद्ध ODI मालिका पराभूत झाली, पण शुभमन गिलकडून रोहित शर्माचं कौतुक; म्हणाला, 'जशी बॅटिंग केली...'

Bidkin Police : डोंगरू नाईक तांड्यावर तलवार, चाकू, कुऱ्हाडी, एअरगनसह एक जण अटक, शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन; बिडकीन पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT