Police officers-employees while checking the vehicles by blocking them. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : धुळे जिल्ह्यात 29 ठिकाणी नाकाबंदी; सातशेवर वाहनांची तपासणी

Dhule : आगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी सोमवारी (ता. ४) सायंकाळी सात ते रात्री दहादरम्यान जिल्ह्यात नाकाबंदी व कोम्बिंग ऑपरेशन राबवून असामाजिक घटकांवर कारवाया केल्या.

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : आगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी सोमवारी (ता. ४) सायंकाळी सात ते रात्री दहादरम्यान जिल्ह्यात नाकाबंदी व कोम्बिंग ऑपरेशन राबवून असामाजिक घटकांवर कारवाया केल्या. २९ ठिकाणी नाकाबंदी करत तब्बल ७२६ वाहनांची तपासणी करण्यात आली. मोटार वाहन कायद्यान्वये १३३ केसेस करण्यात आल्या. संबंधितांकडून ७५ हजारांवर दंडही वसूल करण्यात आला.

पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभरात ही मोहीम राबविण्यात आली.(Dhule Blockade at 29 places in Dhule district by police)

या मोहिमेत २१ पोलिस अधिकारी, ११४ पोलिस अंमलदार व ७० होमगार्डस सहभागी झाले. या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी जिल्हाभरात २९ ठिकाणी नाकाबंदी करून ३७६ दुचाकी व ३५० चारचाकी वाहनांची तपासणी केली. यात मोटार वाहन कायद्यान्वये विविध नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी १३३ केसेस करून संबंधितांकडून ७५ हजार ८०० रुपये दंड वसूल करण्यात आला.

मद्यपींवरही कारवाई

वाहनांच्या तपासणीबरोबरच चार सोडाविक्री गाड्या, मोकळी मैदाने, नदीकाठावरील परिसरात मद्य प्राशन करणाऱ्या तीन जणांवर कारवाई करण्यात आली. (latest marathi news)

तसेच एकूण ११ बार, ढाबे, हॉटेल, लॉजेस व गेस्ट हाउसचीही तपासणी करण्यात आली. या मोहिमेदरम्यान अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांनी नाकाबंदीच्या ठिकाणी भेट दिली. सहाय्यक पोलिस अधीक्षक एस. ऋषिकेश रेड्डी, पोलिस उपअधीक्षक साजन सोनवणे, सचिन हिरे यांनी त्यांच्या उपविभागात नियंत्रण ठेवून नाकाबंदीच्या ठिकाणांना भेटी दिल्या.

दरम्यान, यापूढेही निवडणुका, सण-उत्सवांच्या अनुषंगाने वेळोवेळी नाकाबंदी, कोम्बिंग व ऑलआउट ऑपरेशन राबविण्यात येईल. ही मोहीम आणखी प्रभावी करण्यात येईल, असे पोलिस अधीक्षक धिवरे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICAI CA Final Result 2025 : आयसीएआय सीएचा परीक्षेचा निकाल जाहीर, जाणून घ्या कुठे आणि कसा पाहू शकता?

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : नारायण गडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील व महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न

ठरलं! 'चला हवा येऊ द्या' या दिवशी सुरु होणार... विनोदाच्या गँगवारमधून यंदा भाऊ कदम गायब?

जगातील सर्वात महाग अश्रू! उंटाच्या अश्रूच्या एक थेंबात 26 सापांचे विष नष्ट करण्याची ताकद, संशोधनातून माहिती समोर...

Ashadhi Ekadashi 2025 : देवशयनी आषाढी एकादशी; विठ्ठल भक्तीचा महापर्व, एकात्मता भक्ती व समर्पणाचे प्रतीक

SCROLL FOR NEXT