Meghshyam Borse esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Bribe News : 50 हजारांची लाच स्वीकारताना ग्रामसेवक बोरसे ताब्यात

Dhule Bribe : पन्नास हजारांची लाच स्वीकारताना म्हसदी येथील ग्रामसेवक मेघश्याम रोहिदास बोरसे यास गुरुवारी (ता. २५) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले.

सकाळ वृत्तसेवा

साक्री : म्हसदी (ता. साक्री) येथील महिला ग्रामपंचायत सदस्यांच्या वॉर्डातील शाळेत संरक्षण भिंत, पेव्हर ब्लॉक व मुला-मुलींसाठी सुलभ शौचालय कामास मंजुरी मिळविण्यासाठी तक्रारदाराकडून पन्नास हजारांची लाच स्वीकारताना म्हसदी येथील ग्रामसेवक मेघश्याम रोहिदास बोरसे यास गुरुवारी (ता. २५) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले. (Dhule Bribe Gramsevak Borse arrested while accepting bribe of 50 thousand)

म्हसदी ग्रामपंचायत कार्यालयात धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली. म्हसदी येथील ग्रामपंचायत सदस्यांच्या पतीने त्यांच्या वॉर्डात विकासकाम मंजूर होण्यासाठी सरपंच तसेच ग्रामसेवक मेघश्याम बोरसे यांच्याकडे वेळोवेळी भेटून पाठपुरावा केला होता. तक्रारदार व त्यांच्या पत्नीने ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसेवक बोरसे यांची भेट घेऊन पत्नी सदस्य असलेल्या वॉर्डातील ऊर्दू शाळेत संरक्षण भिंत.

शाळेच्या आवारात पेव्हर ब्लॉक व शाळेच्या मुला-मुलींसाठी सुलभ शौचालयाच्या कामास मंजुरी मिळावी, यासाठी अर्जवजा विनंती केली होती. यावर ग्रामसेवक बोरसे याने या कामाचे अंदाजपत्रकात १२ लाख रुपये किमतीच्या २० टक्केप्रमाणे दोन लाख ४० हजार रुपयांनी काम घेणाऱ्या इच्छुक ठेकेदाराकडून आगाऊ कमिशन घेऊन द्यावे लागेल.

असे तक्रारदारांना सांगितले होते. तक्रारदारांना ग्रामसेवक बोरसे यांना त्यांच्या मागणीप्रमाणे लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी या अनुषंगाने ४ मार्चला धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. (Latest Marathi News)

७ मार्चला तक्रारीच्या पडताळणीदरम्यान ग्रामसेवक बोरसे याने तक्रारदाराकडे तडजोडीअंती दोन लाखांची मागणी करून या रकमेपैकी ५० हजारांचा पहिला हप्ता स्वीकारण्याचे मान्य केले. या अनुषंगाने गुरुवारी (ता. २५) ग्रामसेवक बोरसे याने तक्रारदाराकडे दोन लाखांपैकी पहिला हप्ता ५० हजार रुपये म्हसदी ग्रामपंचायत कार्यालयात स्वीकारत असताना त्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले.

ग्रामसेवक बोरसे यांच्याविरुद्ध साक्री पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कलमान्वये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रूपाली खांडवी, हेमंत बेंडाळे, तसेच राजन कदम, मुकेश अहिरे, प्रशांत बागूल, संतोष पावरा, रामदास बारेला, प्रवीण मोरे, प्रवीण पाटील, मकरंद पाटील, सुधीर मोरे व जगदीश बडगुजर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अखेर तोडगा निघाला! बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे; महायुती सरकारने मान्य केल्या प्रमुख मागण्या, वेतनवाढ आणि ग्रॅच्युइटीवर निर्णय

T20 WC, IND W vs SA W: भारताचे सेमीफायनलचे गणित मारिझान कापच्या 'वन वुमन शो'मुळे बिघडले! दक्षिण आफ्रिकने मँचेस्टरमध्ये दिली मात

Khadakwasla Rain Update: खडकवासला धरण परिसरात तासाभरात ३० मिमी पाऊस; पाणीसाठ्यात वाढ नाही, रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी

Sangli Crime Twist: वेदांत बंडगर खून प्रकरणाला नवे वळण; कुख्यात गुंड म्हमद्या नदाफ अटकेत, पोलिस कोठडीचे अधिकार राखून कारागृहात रवानगी

Paithan Road Crash : पैठण तालुक्यात भीषण अपघात; भरधाव पिकअपच्या धडकेत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, दोन बालकांची प्रकृती गंभीर

SCROLL FOR NEXT